गावगाथा

रविवारी अक्कलकोट श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

गुरुपौर्णिमा विशेष

रविवारी अक्कलकोट श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

HTML img Tag Simply Easy Learning    

(शुक्रवार दिनांक – १९/७/२०२४) – येत्या रविवारी श्री गुरुपौर्णिमा असुन येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्व आहे. असंख्य भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरीता विशेष गर्दी करतात. गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज होय. गुरुंचा महिमा म्हणजे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान. गुरुपौर्णिमेदिवशी
पहाटे ५ वाजता वटवृक्ष स्वामी महाराजांची काकड आरती संपन्न होईल. त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात येईल याची भाविकांनी नोंद घ्यावी. दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे, तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा, व भोजनप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button