अविरत संघर्ष…. अद्वितीय लोकनेता…..कै.बसवेश्वर नरोळे
दक्षिण सोलापूर तालुक्याचे लोकनेते व आमचे प्रेरणास्थान कै. बसवेश्वर नरोळे हे २२ जुलै १९९८ रोजी कैलासवासी झाले, त्यांचा २६ वा पुण्यस्मरण....

अविरत संघर्ष…. अद्वितीय लोकनेता…..कै.बसवेश्वर नरोळे

दक्षिण सोलापूर तालुक्याचे लोकनेते व आमचे प्रेरणास्थान कै. बसवेश्वर नरोळे हे २२ जुलै १९९८ रोजी कैलासवासी झाले, त्यांचा २६ वा पुण्यस्मरण….

कै. बसवेश्वर अर्जुनप्पा नरोळे यांची दक्षिण सोलापूर तालुक्यात स्वाभिमानी आणि निस्वार्थ लोकप्रतिनिधी म्हणून ख्याती होती त्यांचा जन्म ११ जानेवारी १९४६ रोजी झाला.

लहानपणापून पिता अर्जुनप्पा मातोश्री धानव्वा यांच्याकडून त्यांना चांगले संस्कार मिळाले. त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये लोकसेवा करण्यात अव्वल राहिले. राजकारणाबरोबर त्यांनी काळ्या मातीत सुगंध शोधत आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या पद्धतीने आपला ठसा उमटवलेला होता, त्यांनी आपले आरोग्य उत्तम रित्या जपण्यासाठी साठी ते कुस्ती खेळत, हे करत असताना अनेक चांगले मल्ल त्यांनी घडविले.

कै. नरोळे साहेबांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम माध्यमिक शाळा काढली आणि नंतर श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्थेच्या मदतीने लि.श्री.ष.वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हायस्कूलची स्थापन करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले, याद्वारे समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना हायस्कूलचे शिक्षण घेण्यासाठी पूर्वी वळसंग येथे जावे लागत पण या शिक्षण संस्थेमुळे लिंबी चिंचोळी सह भागातील रामपूर, तोगराळी, हणमगाव व गुर्दहळ्ळी या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुखकर झाले.

कै. नरोळे साहेब आपल्या राजकीय जीवनात कार्यरत असताना सर्व सामान्य जनतेला विविध कल्याणकारी व समाज उपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. सामान्य कार्यकर्त्यांचे, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्या व इतर अडचणी समजून ते आपुलकीने सोडवत असत.
कै. नरोळे साहेब आज हयात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत, त्याच्या विचारास अनुसरून वाटचाल करित राहिल्यास नक्कीच यश मिळेल आजच्या स्पर्धेच्या युगांत त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कै.बसवेश्वर अ. नरोळे सार्वजनिक वाचनालय अणि सामाजिक- सांस्कृतिक के क्रिडा मंडळ कार्यरत आहे
कै. नरोळे हे राजकारणातील एक संयमी त मितभाषी व्यक्तिमत्व मानले जात होते. त्यांचे आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये चांगली पकड होती, याच आधारे विरोधकांनाही आपल्यात सामावून घेऊन विकासासाठी एकत्रित होण्याची नेतृत्व कला त्यांच्या अंगी होते. याच राजकीय नेतृत्व शक्तिमुळे आपले यश खेचून आणण्यात नेहमी अव्वलस्थानी असत, त्यांनी गावच्या सरपंच पदापासून दक्षिण सोलापूर पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती पर्यंतची अनेक पदे भुषवून त्यांनी लोकांची कल्याणकारी कामे करण्यात आपले जीवन व्यथित केले.
कै. बसवेश्वरजी नरोळे साहेबांना राजकारणात मा. विजयसिंह दादा मोहिते पाटील,स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील, लि.भीमराव पाटील वडकबाळकर, स्व.गोपाळराव काका कोरे, टाकळीचे मा.कलशेट्टी सावकार, मा.कल्याणराव पाटील, मा.जाफरताज पाटील, मा. सायबणा पाटील, मा.चंद्रकांत हविनाळे आदी जण सहकारी म्हणून लाभले.
कै. नरोळे साहेब हे जिवंत असते तर ते नक्कीच आमदार आले असते असे वाक्य त्याच्या सहकार्याच्या तोडून आल्याशिवाय राहत नाही यावरुनच आपल्याला कै.नरोळे साहेबांचे प्रेम कळते. कै. नरोळे यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारसा जेष्ठ सुपुत्र मा. श्रीशैल नरोळे हे पुढे चालवत आहेत त्यांनी देखील आपल्या वडिलांप्रमाणे राजकीय व सहकार क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कै. नरोळे साहेब हे नरोळे घराण्यातील एक दानशूर व्यक्ति होते त्यांनी आमच्या गाडीवान घराण्यातील लोकांवर अनेक अगणित उपकार केले आहेत म्हणून आम्ही साहेबांचे आणि नरोळे घराण्याशी एकनिष्ठ आहोत. सदैव त्यांचे ऋणी आहोत.
कै. नरोळे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. जनसामान्यांचे आधारवड कै. बसवेश्वर अर्जुनप्पा नरोळे यांच्या २६ व्या पुण्यस्मरणदिनी भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन !!!!
✍🏻
खाशिम नुरोद्दीन गाडीवान
लिंबी चिंचोळी ता. दक्षिण सोलापूर