*म्हेत्रे प्रशाला व गुरुशांतलिंगेश्वर ज्युनिअर कॉलेज दुधनी येथे गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न*
गुरुपौर्णिमा विशेष

*म्हेत्रे प्रशाला व गुरुशांतलिंगेश्वर ज्युनिअर कॉलेज दुधनी येथे गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न*

दुधनी मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला आणि श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्यु. महाविद्यालया तर्फे गुरुपौर्णिमा सोहळा साजरा करण्यात आले. मादन हिप्परगीचे पूज्यनीय गुरु श्री. म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामीजी यांचे गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम श्री.म नि.प्र.लिं.गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या गुरुवंदना कार्यक्रमात श्री. म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामी यांची पादपूजा करण्यासोबतच शाळेचे शिक्षक एकनाथ मोसलगी सहदांपत्य सहित गुरु वंदना केली. पुष्प अर्पण आणि गुरूंना फळे अर्पण केले. आपल्या देशाच्या संस्कृतीनुसार गुरूला खूप महत्त्व दिले जाते. गुरूंचे महत्त्व परमपूज्यांनी विस्मयकारकपणे सांगितले. शाळा हे जिवंत देवाचे मंदिर आहे. गुरुपौर्णिमा सोहळ्यात दुधनीच्या श्री मठाचे धर्मदर्शी असलेले सिद्धराम मल्लाड, सिद्धराम येगदी, महांतेश पाटील आणि सिद्धराम टक्कळकी, शिक्षक शरणगौडा पाटील, रामचंद्र गद्दी, बसवराज बंद्राड, राजकुमार बिराजदार,श्रीशैल माळी, सुनिल आडवितोटे, बसलिंगप्पा पट्टणशेट्टी, बाशा लावणे प्रशाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कल्याणी करडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. काशिराय हविनाळे यांनी वंदन केले.
