कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या आठ दिवसात राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यादरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक घेण्यात आली.

या बैठीकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कोतवालांच्या मानधनात वाढ यासह धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना इत्यादी महत्वाच्या योजनांचा समावेश आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय

कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग)

ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान (नियोजन विभाग)

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार.एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. (नगर विकास विभाग)

ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता (नगर विकास विभाग)
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार (नगर विकास विभाग)
देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना. (पशुसंवर्धन विभाग)
भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा देण्यात आली असून नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार (क्रीडा विभाग)
रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा (महसूल विभाग)
राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार (जलसंपदा विभाग)
जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार (जलसंपदा विभाग)
लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग)