
शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची उत्साहात सुरुवात…

मुंबई प्रतिनिधी….गणेश हिरवे… २२ ते २८ जुलै साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षण सप्ताह निमित्ताने आज पहिल्या दिवशी
अध्ययन अध्यापन साहित्य दिवस आनंदात व उत्साहात संपूर्ण राज्यात आणि प्रामुख्याने मुंबईत संपन्न झाला.
मुंबई पश्चिम जिल्हातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक स्वतः ला विसरुन अध्ययन अध्यापन साहित्य तयार करण्यात रममान झाल्याचे चित्र सर्वदूर दिसून आले.
मुंबई चे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी या उपक्रमात सर्व शाळा व विद्यार्थी यांचा उच्चांकी सहभाग पाहून सर्वांचे मनापासून कौतूक व अभिनंदन केले आहे. मुंबई पश्चिम चे शिक्षण निरीक्षक सुनिल सावंत तसेच शिक्षण उपनिरीक्षक अश्विनी लाठकर यांनी आज TLM Day (टीचींग लर्निग मटेरियल डे) च्या दिवशी तयार केलेल्या दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शाळांचे अभिनंदन करत संपूर्ण शिक्षण सप्ताहात नियोजनानुसार कार्यान्वयन करण्याचे आवाहन केले.आज झालेल्या कार्यक्रमात श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी पूर्व, श्रीराम विद्यालय अंधेरी, सेंट मेरी शाळा कालिना, झेवियर्स स्कूल, स्वामी विवेकानंद शाळा मालाड आणि इतर अनेक शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
