गावगाथा

सौ.सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल मध्ये शिक्षण सप्ताहास उत्तम प्रतिसाद..

शैक्षणिक बातमी

सौ.सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल मध्ये शिक्षण सप्ताहास उत्तम प्रतिसाद..

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट: महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयाच्या वतीने दि 22 जुलै 2024 पासून शिक्षण सप्ताहास प्रारंभ झालेला आहे. पहिल्या दिवशी अध्ययन-अध्यापन साहित्य प्रदर्शन मांडण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात इ.5 वी ते 10 वी तील विद्यार्थी सहभागी होते.
दुसरा दिवस दि 23 रोजी विद्यार्थ्याना गणित सोप्या पध्दतीने समजावून सांगण्यासाठी काही क्लुप्त्या, कोडे, पोस्टर्स प्रदर्शन घेण्यात आले. शिवाय गणितीय खेळ, गणित तज्ञांच्या गोष्टी सांगितले गेले. यावेळी गणित तज्ञ व सेवानिवृत्त शिक्षक बसवराज बंडगर, रविकिरण दंतकाळे, शिवानंद पुजारी आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षण सप्ताहाचा तिसरा क्रीडा दिवस होता. यादिवशी मुलाना खेळाविषयी आवड निर्माण होणेसाठी विविध खेळ, पोस्टर्स प्रदर्शन घेण्यात आले. काही विद्यार्थी खेळाचे महत्त्व सांगितले. कबड्डी, लंगडी,फुगडी,लिगोरी याशिवाय सापशिडी, बुध्दीबळ,सोंगट्या,कोडे आदी खेळ घेण्यात आले. पोस्टर्स प्रदर्शन मध्ये
क्रिकेट वीर सचिन तेंडुलकर, आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खा सिंग, बॉक्सिंगपट्टू मेरी कॉम, रायफल शूटर अभिनव बिंद्रा, लांबउडी-अंजू जॉर्ज या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    


या सर्व कार्यक्रमास संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सीईओ रूपाली शहा, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप,प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेवानिवृत्त शिक्षक खंडेराव घाटगे, शिवानंद पुजारी आदी मराठी, कन्नड, सेमी विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button