वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सर.
शैक्षणिक बातमी

वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सर.
—————————————-
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांचा ९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ सन्माननिय श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कै. सरांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहण्यात आली.यानंतर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अशोक साखरे यांनी वक्तृत्व,नेतृत्व, कर्तृत्व,आणि दातृत्व या कै. सरांच्या अंगी असलेल्या चतुरस्त्र पैलूवर प्रकाश टाकला तर सौ. सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. चंद्रकांत व्हनमाने यांनी संस्थेच्या प्रारंभिक प्रतिकूल परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना उपलब्ध सर्व सोयीसुविधांचा लाभ घेत प्रगती करण्याचे आवाहन केले तर हन्नूर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. बसवराज बंडगर यांनी कै.सरांच्या इतिहाससारखा विषय व सहज सोप्या पद्धतीने शिकवण्याची त्यांची हातोटी यावर आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी युवा नेते व उपसरपंच श्री.सागरदादा कल्याणशेट्टी,हन्नूर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. विलास बिराजदार, सौ. सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.अशोक दंतकाळे, सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक श्री. विश्वनाथ चव्हाण, डोंबरजवळग्याचे पालक श्री. बाबूराव गवळी , प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अप्पासाहेब काळे,प्रा.रविंद्र कालीबत्ते,श्री. रमेश शिंदे, श्री.शशी अंकलगे ,श्री.धनंजय जोजन,जेष्ठ शिक्षिका सौ. मृदुला देवी स्वामी,समस्त शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग सहाय्यिका सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी केले तर आभार सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी मानले.