गावगाथाठळक बातम्या

Pune: पुण्यात आतापर्यंत पावसामुळे चार बळी ; येत्या २४ तासांसाठी जिल्ह्यात रेड अलर्ट

पुणे : पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी खडकवासला धरणातून  झालेला 40 हजार क्युसेकचा विसर्ग यामुळे पुण्यात भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. पुण्यात अनेक भागात पाणी शिरलंय. पुण्याच्या निंबजनगर, एकता नगर भागात जवळपास 4 ते साडेचार फूट पाणी साचलंय. त्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात बचावकार्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आलीय.सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झालाय. तर मुसळधार पावसात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

 

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुण्याला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असून विजेचा धक्का लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भिडे पुलाजवळील घटना घडली आहे. अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेक्कन भागात तीन जणांचा हातगाडी हलविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ज्या हातगडीवर धंदा करायचे त्या हातगडीला पुराच्या पाण्यात वाचवताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

 

भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

 तर ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झालास असे मुळशी तहसीलमध्ये, जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले. पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, मुळशी तहसीलमधील ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे.जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस रस्त्यावरील ढिगारा हटविण्याचे काम करत असून, ते हटवल्यानंतर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणाप आहे लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट

खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली तालुके आणि पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर परिसरातील ‘घाट’ (डोंगरातील खिंडी) विभागातील अतिवृष्टीचा विचार करून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम सखल भागात तैनात करण्यात आल्या आहेतय जेथे पूर आणि पूर येण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचे आवाहन दिवसे यांनी केले. आयएमडीने पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. विनाकरण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button