महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागास सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे शैक्षणिक शुक्ल व परीक्षा शुल्काचा शंभर टक्के लाभ देण्यात येईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
शैक्षणिक बातमी

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागास सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे शैक्षणिक शुक्ल व परीक्षा शुल्काचा शंभर टक्के लाभ देण्यात येईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अक्कलकोट, दि.२७- महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागास सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे शैक्षणिक शुक्ल व परीक्षा शुल्काचा शंभर टक्के लाभ देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. २५) राज्यातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी ऑनलाईन संवाद साधला. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयातील सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांवर चर्चेसाठी आयोजित ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याप्रसंगी
संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, प्राचार्य डॉ. शिवराय आडवितोट, शिष्यवृत्ती समितीचे समन्वयक प्रा. सिध्दाराम पाटील, प्रा. शितल बहिर्जे, प्रा. प्रिती चव्हाण, प्रा. लक्ष्मी रेड्डी, आदीसह विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व सुमारे २५० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


राज्यातील शासकीय महाविद्यालये, अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम
विनाअनुदानित महाविद्यालयांमधील
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा
शुल्कात १०० टक्के लाभ देण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी वेबीनार माध्यमातून संवाद साधला. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांसाठी या ऑनलाईन संवादाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तरे दिली. वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थीनींना मार्गदर्शन करुन संवाद साधला. मुलीचे मोफत शिक्षण व इतर शिष्यवृत्ती संबंधी त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. किशोर थोरे, डॉ. अप्पासाहेब देशमुख, प्रा. संध्या इंगळे- अरखराव, डॉ. गीता हारकूड, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ —
अक्कलकोट – शिक्षण मंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमाला खेडगी महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, प्राचार्य डॉ. आडवितोट, प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.