
अनंत चैतन्य प्रशालेत ” पर्यावरण संवर्धनासाठी इको क्लब ” ची स्थापना—–
—————————————-
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ” शिक्षण सप्ताहाचा “सहावा दिवस ” मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम” असल्याने पर्यावरण संवर्धन व पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे ” इको क्लब ” ची स्थापना करण्यात आली.यावेळी माता पालक व मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्षारोपणाच्या ठिकाणी त्यांच्या नावाचे फलक लावण्यात आले . या वृक्षारोपणाकरिता माता पालक म्हणून हन्नूर च्या माजी महिला सरपंच सौ.संतोषी बाळशंकर, आशा वर्कर सौ. मायव्वा घोडके, सौ. सुनिता बाळशंकर व पाल्य म्हणून श्रृती, साक्षी व शिवानी उपस्थित होत्या. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी ” वृक्षारोपण, संवर्धन व रक्षण ” याविषयी मार्गदर्शन करुन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री ज्ञानदेव शिंदे, प्रा.रविंद्र कालीबत्ते, प्रा. रमेश शिंदे,इको क्लब शिक्षक प्रा. काशीनाथ पाटील, श्री. अप्पासाहेब काळे, श्री. धनंजय जोजन, श्री. शशी अंकलगे, सौ. मृदुलादेवी स्वामी, सौ. मल्लम्मा चप्पळगाव,सौ.स्वप्नाली जमदाडे व विद्यार्थी उपस्थित होते.
