गावगाथा

“रयत क्रांती संघटना जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर “

निवड नियुक्ती

“रयत क्रांती संघटना जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर “
———————————————
सोलापूर दि.२७ रयत क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री बसवराज कोळी व सोलापूर शहर उपाध्यक्ष पदी राहुल माने यांची निवड महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार यांनी केली.या निवडी निमित्त बसवराज कोळी व राहुल माने यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.डा भीमाशंकर बिराजदार म्हणाले की,ख-या अर्थाने शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी देशाची सेवा प्राणपणाने करीत आहेत.त्यापेक्षा ही जोमाने काम करतील.शेतकरी कष्टकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन काम करणारे आमदार सदाभाऊ खोत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन समाज कार्य करा असे आवाहन केले.
याप्रसंगी बसवराज कोळी व राहुल माने यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिक काम करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस हणमंत गिरी,अमोल वेदपाठक युवा अध्यक्ष, अँ ड यशवंत पाटील धाराशिव, सिध्दाराम पुजारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button