प्रेरणादायक

पायल’झाली जलकन्या ! ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाला मिळालेली गावकऱ्यांच्या पसंतीची पावती

पायल'झाली जलकन्या !

पायल’झाली जलकन्या !

HTML img Tag Simply Easy Learning    

‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाला मिळालेली गावकऱ्यांच्या पसंतीची पावती

HTML img Tag Simply Easy Learning    

रजनीश जोशी, सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning    

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील भीमा नदीचे पात्र आणि नदीकाठ आज सोमवारी गावकरी, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी फुलून गेलं होतं. निमित्त होतं ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमांतर्गंत कुसुर इथं आयोजिलेल्या नदीसंवाद यात्रेचं. या नदीसंवाद यात्रेचा गावकऱ्यांवर इतका अनुकूल आणि हृद्य परिणाम झाला की गावातल्या आठ वर्षांच्या ‘पायल’चं नाव तिच्या आजच्या वाढदिनी बदलून चक्क ‘जलकन्या’ करण्यात आलं. त्यासाठी आवश्यक ते बदल कागदपत्रात अगदी आधारकार्डवरही करण्यात येत आहेत… ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाला भीमानदीकाठी मिळालेला राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला आणि एकमेव प्रतिसाद आहे.
आपल्या गावातील भीमा नदीचं पात्र स्वच्छ राखणं आणि ही नदी अमृतवाहिनी करण्यासाठी आलेल्या विविध सरकारी अधिकारी, जलअभ्यासक, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीने कुसुरच्या गावकऱ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले ! पूर्वाश्रमीची पायल आणि आताची जलकन्याचे वडील मलकारी हक्के यांनी आपल्या कन्येचं पुनर्नामकरण करण्यामागची भूमिका सांगितली. ते म्हणाले, ” नदी आणि पाण्यासाठी सरकार इतकी मोठी मोहीम सुरू करीत आहे, त्यात आमचा सहभाग गावकरी म्हणून तर राहणारच, आज सोमवारी (ता. २६ डिसेंबर २२) माझ्या मुलीचा आठवा वाढदिवस आहे. तिचे नाव ‘जलकन्या’ ठेवावे असे मला वाटले. भीमा नदीची संवाद यात्रा मोहीम आमच्या गावातून सुरू झाल्याने मी ही संधी घेतली. खरं तर आमच्या गावच्या सगळ्याच मुली जलकन्याच आहेत. पण आमची ‘पायल’ची आता ‘जलकन्या’ म्हणून अधिकृतरित्या ओळखली जाईल. ”
तहसीलदार राजकुमार लिंबारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, भीमा नदी समन्वयक रजनीश जोशी, जलबिरादरीचे अंकुश नारायणकर, जलसंपदा विभागाचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, विविध शिक्षक, महिला बचत गटाच्या महिला, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, कुसुर ग्रामपंचायतीचे सगळे पदाधिकारी असे अनेकजण यावेळी उपस्थित होते. या घटनेबद्दल श्री. लिंबारे यांनी आश्चर्यमिश्रित आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘कुसुर गावकऱ्यांनी ‘चला जाणूया नदीला’ या उत्तम उपक्रमाला दिलेली ही पावतीच आहे. श्री. हक्के यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मुलीचे नाव जलकन्या ठेवले हे मला कार्यक्रमाच्या ठिकाणीच कळाले. आपल्या गावच्या नदीच्या विकासासाठी कुसुरकर किती आतुरलेले आहेत, त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.” बीडीओ बाळासाहेब वाघ यांनीही मलकारी हक्के यांच्या कृतीचे कौतूक केले. छोट्या पायलला आपले नवे नाव खूप आवडले. तिने शाळेतल्या आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला. नदीसंवाद यात्रेत गावकरी प्रेमाने सहभागी होत आहेत. तहसीलदार श्री. लिंबारे आणि बीडीओ श्री. वाघ यांनी अन्य सर्व विभागांच्या सहकार्याने ३० डिसेंबरपर्यंतची ही मोहीम अधिक नेटाने आणि उत्तमरीतीने राबवण्याचे नियोजन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

छायाचित्रात जलकन्या तथा पायल आणि तिचे वडील मलकारी हक्के, कुसुर

HTML img Tag Simply Easy Learning    

रजनीश जोशी, सोलापूर
मोबाईल – ९८५००६४०६६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group