ग्रामीण घडामोडी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुरुम शहर कडकडीत बंद

मुरूम, ता. उमरगा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदचे निवेदन सपोनि पवनकुमार इंगळे यांना निवेदन देताना क्रांती मोर्चाचे पदाधिकारी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुरुम शहर कडकडीत बंद

मुरुम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता. अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असताना उपस्थित आंदोलकांवर अमानुष पद्धतीने पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केला. त्यात अनेक महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती अशा सर्वांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण केली. जगाला हेवा वाटावा असे आंदोलने आजतागायत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पार पडले आहे. त्याच पार्श्वभूमीवरती हे देखील आंदोलन चालू असताना प्रशासनाने याकडे डोळे झाक करत अमानुष लाठीचार्ज केला. त्यामुळे पोलीस प्रशासन व आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ मुरूम शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (ता. १) रोजी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अजित चौधरी, भगत माळी व मोहन जाधव यांनी आंदोलना संबंधी भावना व्यकत करताना मराठा आरक्षण या गंभीर प्रश्नावर सर्वच राजकीय पक्ष केवळ वेळकाढूपणा करत असल्याने समाज संतप्त झाला आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारसह सर्वच राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे. उपस्थित समाज बांधवांच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी राहुल वाघ, दादा बिराजदार, संजय सावंत, श्रीधर इंगळे, संजय बेंडकाळे, विकास शिंदे, सचिन शिंदे, सुधीर चव्हाण, सुरेश मंगरुळे, ज्ञानेश्वर चौधरी, राघुभाऊ शिंदे, महेश पाटील, विशाल मोहिते, रजनीकांत वाघ, सुदर्शन आवताडे, हणमंत टेकाळे, नेताजी गायकवाड, संदीप टेकाळे, सुरज चौधरी, वैभव इंगळे, वैभव शिंदे, मुकुंद सुर्यवंशी, संदीप जाधव, अविनाश चव्हाण, भिमा बेंडकाळे यांच्यासह असंख्य मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदचे निवेदन सपोनि पवनकुमार इंगळे यांना निवेदन देताना क्रांती मोर्चाचे पदाधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button