गळोरगी येथे विविध स्पर्धा संपन्न
(श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच चा अभिनव उपक्रम, बाळगोपांळासाठी ठरली पर्वणी)

गळोरगी येथे विविध स्पर्धा संपन्न

(श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच चा अभिनव उपक्रम, बाळगोपांळासाठी ठरली पर्वणी)


ता. अक्कलकोट येथील मौजे गळोरगी येथे श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव २०२५ निमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच, श्री समर्थ कॅाम्प्युटर्स सोलापुर व गळोरगी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गळोरगी गावातील लहान मुले व मुलींसाठी विविध स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.प्रामुख्याने बाळगोपांळासाठी लिंबु चमचा, लंगडी व संगीत खुर्ची या स्पर्धचे आयोजन केले होते. लहान गट मुले व मुली वय ५ ते ८ वर्ष , मोठा गट मुले व मुली वय ९ ते १२ वर्ष अशा सर्वांनी स्पर्धत उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रत्येक सामन्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारीतोषिक देण्यात आले. सर्व विजेते सन्मानचिन्ह पारीतोषिके समर्थ कॅाम्प्युटर्स व टाईपरायटींग ईन्स्टिट्युट सोलापुरचे संस्थापक श्री गुरुशांत बिराजदार सर यांच्या वतीने देण्यात आले. प्रत्येक सामन्यात गळोरगीतील सर्व बाळगोपाळांचा उत्साह पाहण्यासाठी गावातील नागरीकांनी व क्रिडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.क्रिडा स्पर्धचे उदघाटन वे शरणय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पोलीस पाटील श्री सुरेश मैंदर्गी यांनी केले तर आभार श्री शिवानंद बिराजदार सर यांनी मानले. सर्व विजेत्या खेळांडुंचे प्रोत्साहनपर अभिनंदन श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री धर्मराज बिराजदार, श्री चंद्रकांत निरोणे, श्री सिध्दाराम प्रचंडे , श्री शरणराज पाटील, श्री शिवराज भोसगी ,श्री चंद्रकांत बिराजदार व गळोरगी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री वहीदपाशा शेख , श्री संतोष जमादार , ए बी फॅार्मास्युटीकल्स पुणेचे श्री संतोष बिराजदार , गळोरगी ग्रामस्थ व क्रिडाप्रेमी व खेळांडुचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गळोरगी ग्रामस्थांनी या क्रिडास्पर्धा आयोजनाचे कौतुक करत खेळांडुचा मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या अंतर्गत गुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा दरवर्षी भरवण्याचे सांगितले. या पुढे ही गळोरगी येथील प्रत्येक यात्रेत क्रिडा स्पर्धा आवर्जुन घेणार असल्याचे श्री सिध्देश्वर बिराजदार यांनी सांगितले.
