वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत CCTV कॅमेरा लोकार्पण सोहळा संपन्न ..
शाळा व्यवस्थापन समितीचा उपक्रम

वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत CCTV कॅमेरा लोकार्पण सोहळा संपन्न ..
दिनांक ०४/०१/२०२३ वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वागदरी येथे लोकवर्गणीतून CCTV कॅमेरा पूर्ण सिस्टम बसवून त्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी चप्पळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री प्रशांत अरबळे साहेब* हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना *भूरिकवठा व वागदरी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री बा. ना. चव्हाण साहेब* यांनी करून कार्यक्रमास सुरुवात केली. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. CCTV कॅमेरा सिस्टम खरेदी करण्यास मदत करणारे *गोगाव गावचे सुपुत्र मा. श्री नंदकुमार सुरवसे* *यांच्या सहकार्यातून आज रोजी वागदरी येथील डॉ. लिंगराज नडगेरी व डॉ. शिल्पा नडगेरी* या दाम्पत्यांच्या शुभहस्ते CCTV सिस्टमचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये *प्रमुख अतिथी* म्हणुन वागदरी गावचे *उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई पोमाजी,* वागदरी बीट हवालदार *श्री. विपीन सुरवसे साहेब,* वागदरी तंटामुक्त अध्यक्ष *श्री. शाणप्पा मंगाणे साहेब,* वागदरी ग्रामपंचायत शिक्षण समिती अध्यक्ष *श्री. हनीफ मुल्ला साहेब,* वागदरी ग्रामपंचायत सदस्य *श्री शिवानंद घोळसगाव साहेब,* भूरिकवठे येथील सामाजिक कार्यकर्ते *श्री. शहाबुद्दीन शेख,* गोगाव येथील *श्री शाम पाटील,* चप्पळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री. बंडगर साहेब,* हन्नुर केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री. विजापरे साहेब* व किणी केंद्राचे केंद्रप्रमुख *श्री. म. सि. चव्हाण साहेब* इत्यादी उपस्थित होते. CCTV सिस्टम देणारे व सर्व प्रमुख अतिथी यांचे शाळेतर्फे यथोचित असा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती *अध्यक्षा सौ. रेखा विकास नडगेरी* व उपाध्यक्ष *श्री शिवशरणप्पा सुरवसे* (तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ता. अक्कलकोट), मुख्याध्यापक श्री सावंत, सहशिक्षिका सौ मोटे मॅडम व सौ कविता फड मॅडम यांनी परिश्रम घेतले.
