ग्रेट भेट

रुग्णसेवक ही ओळख खरी करत सर्वसामान्यांचा आधारवड बनलेले ; मंगेश चिवटे

ग्रेट भेट .......मंगेश चिवटे

रुग्णसेवक ही ओळख खरी करत सर्वसामान्यांचा आधारवड बनलेले ; मंगेश चिवटे

HTML img Tag Simply Easy Learning    

गेल्या आठवड्यात माझे.मार्गदर्शक मा.विश्वनाथ पाटील साहेब (उच्च न्यायालयाचे वकील) याचा दुपारी १२ दरम्यान फोन आला पुण्यात आलोय भेटू या साडेतीन दरम्यान पुणे महानगरपालिका येथे या म्हणून सरांनी सांगितले तुम्हाला एका व्यक्तीशी सोबत भेटू घालून द्यायचं आहे.म्हणून मा.मंगेश चिवटे याचं नाव सांगितलं क्षणाचा विचार नकरता तात्काळ येतो सर नक्की म्हणून कामावर सांगून सायकल वरुन पटापट तीन वाजताच पुणे महानगरपालिके च्या मुख्य इमारत येथे पोचलो.
मला उत्सुकता होती मंगेश चिवटे यांना भेटण्याची मी माझे मित्र सोमेश्वर वाडी यांना कल्पना दिली ते काही वेळानं आले.त्यानंतर दुसरे मित्र आंनद चौगुले हे सरांना भेटण्यासाठी एकत्र जमलो.काही वेळानं पाटील सराना फोन केला.व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे तेथून निघून मंगेशकर हाँस्पीटल येथे थोड्या वेळात पोचतो या भेटू म्हणाले पुन्हा गडबड करुन हाँस्पीटल पर्यत पोचताच सर पुन्हा एका ठिकाणी निघाले सकाळ पासून अनेकांना भेट सुरू असल्याने धावपळ सुरूच होतं शेवटी कोथरुढ येथे एका हाँटेल मध्ये नाष्टा करण्यासाठी सर्व थांबले असता आम्ही तिथे पोचलो.एकदाचे भेट झाली.एका ऊर्जावान उत्साही हाडाचा पत्रकार चिवटे सरां सोबत तास सविस्तर गप्पागोष्टी सुरू झाल्या..
चिवटें सरानी स्टार माझा,जय महाराष्ट्र,साम टिवी, आयबीएन लोकमत अशा प्रसिद्ध न्यूज चॅनेलमधे काम केलं आहे.पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे कामाची पद्धत व रुग्णसेवे बदल आस्था अफाट आहे.चिवटे सर पत्रकार क्षेत्रात कार्यरत असताना त्याना लोकांची समस्या चांगल्या प्रकारे जाण झाली होती.त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर चिवटेसरांनी रुग्णसेवा करण्याचा संकल्प केला.त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत.गरिबांनी आजारी पडूच नये अशी परिस्थिती आज आलीय. गंभीर आजारांवर दीर्घकालीन उपचार आणि महागड्या शस्त्रक्रिया करू शकतील, एवढा पैसाच त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे चांगल्या उपचारपद्धती उपलब्ध असूनही अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. यावर ठोस तोडगा काढून निर्धन लोकांचे जीव वाचवण्यासाठी मुंबईत बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती झाली.
या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आहेत मंगेश चिवटे. गोरगरीब, निराधार लोकांना मायेचा ओलावा देऊन देवानं दिलेलं माणसाचा जन्म सार्थकी करावा ही त्यांच्या आईवडीलांची शिकवण. तोच जीवनमंत्र आत्मसात करून चिवटे यांनी वैद्यकीय सेवेची पालखी खांद्यावर घेतलीय.आजवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाखो हजाराहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार करण्यात आलेत. चिवटे यांच्या प्रयत्नातून उभारलं गेलेलं हे ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय.सत्य आणि तिथकेच वास्तव आहे.
त्याच्या सोबत चर्चा करताना सतत लोकांशी बोलणे त्याची अडचण समजून घेणे कर्तव्य फार पाडत होते.माझी ओळख मा.पाटील सरांनी करून दिले.त्याना भेटून अतिशय आंनद झाला.अक्कलकोट घडामोडी फेसबुक ग्रुप बदल माहिती दिलं त्याना आवडले.तसेच ग्रामीण संस्कृती आधारित पहिले गावगाथा दिवाळी अंक भेट दिले.त्या मागील माझी संकल्पना त्याना सांगितलं अरे वा छान म्हणत नंदे नक्कीच गावगाथा वाचून प्रतिक्रिया देतो.छान झाला आहे दिवाळी अंक असे दाद हि दिले.
त्याच दरम्यान नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे तिथे त्याच लक्ष होतंच मोबाईल मधून चर्चा ऐकत होते.अतिशय लहान वयात अनेक जबाबदारी उत्कृष्ट पणे सांभाळणारे चिवटे सर एक ग्रेट व्यक्तीमत्व आहेत.महाराष्ट्रातील हजारो रुग्णांचे रुग्णसेवक ही ओळख खरी करत सर्वसामान्यांचा आधारवड बनलेले आहेत चिवटे सर..
महाराष्ट्र शासनाचे या सगळ्या योजना योग्य व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी चिवटे सर हे कक्षाचे प्रमुख या नात्याने निरंतर प्रयत्नशील असतात. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून १५ हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्यात. त्यात कॅन्सर, ब्रेन ट्युमर, किडनी, लिव्हर इन बोनम्यारो ट्रान्सप्लांट, बायपास, मोतीबिंदू, एजिओप्लास्टी, कोकलीयर इमप्लांट, लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रांचं ऑपरेशन अशा शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
अशा ग्रेट व्यक्तीमत्वा सोबत काही वेळ घालवता आलं याच समाधान आहे.त्याच्या कार्याला मनापासून शुभेच्छा.त्याच्या हातून रुग्णसेवा असेच सदैव घडो हिच शुभकामना

HTML img Tag Simply Easy Learning    

स्पेशल धन्यवाद मा.अँड विश्वनाथ पाटील साहेब त्याच्या मुळे शक्य झाली…

HTML img Tag Simply Easy Learning    

शब्दांकन ✍️
धोंडपा नंदे,गावगाथा
9850619724…

HTML img Tag Simply Easy Learning    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button