गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : “वाचनाने माणसाचे व्यक्तित्व खुलते”– सागर कल्याणशेट्टी

अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे आजरोजी ” महावाचन उत्सव ” साजरा करण्यात आला.

प्रारंभी ” चुल आणि मुल” यामध्ये खितपत पडलेल्या स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व अशा महाविभुतींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत राहावी याकरिता त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन आपले योगदान देण्याचा प्रयत्न करणारे शिक्षणमहर्षी, संस्थापक अध्यक्ष कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

“वाचनाने माणसाचे व्यक्तित्व खुलते एवढेच नव्हे तर वाचनाने माणसाला स्व- ची जाणीव होते व आपल्याला समृद्ध बनवते याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांने मोबाईल मध्ये गुंतून न राहता वाचनाचा छंद जोपासला पाहिजे असे प्रतिपादन हन्नूर चे उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी यांनी केले. याप्रसंगी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक शहाजी माने यांनी “वाचन संस्कृती व आपण ” याविषयी आपले मनोगत व्यक्त केले, तर कुमार सुदर्शन घोडके, कु. स्मिता काळे, कु. रूद्रायणी हत्तूरे, कु. करुणा हेगडे, कु. समिक्षा बाबर, कु. सृष्टी उदगीरे या मुला- मुलींनी शालेय ग्रंथालयातील विविध महापुरुषांच्या, लेखक, साहित्यिक यांच्या पुस्तकातील प्रस्तावनेचे वाचन केले.

यानंतर प्रशालेचे ग्रंथपाल श्री. काशिनाथ हताळे यांनी शालेय ग्रंथालयातील विविध प्रकारच्या उपलब्ध पुस्तकसंग्रहाची माहिती विद्यार्थ्यांना दिली व पुस्तके घेऊन वाचण्यासाठी आवाहन केले.यानंतर वाचनालयातील पुस्तके देऊन सर्व विद्यार्थ्यांचे “सामूहिक वाचन ” घेण्यात आले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, पर्यवेक्षक ज्ञानदेव शिंदे, जेष्ठ शिक्षिका मृदुलादेवी स्वामी, प्रा. रविंद्र कालीबत्ते, सहशिक्षक शशीकांत अंकलगे ,सुरेश जाधव, राजेंद्र यंदे व विद्यार्थी उपस्थित होते.अशाप्रकारच्या विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या, धडपडणाऱ्या शिक्षक- शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य, आधारस्तंभ सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती , सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभागप्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button