भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी आपण त्यांना वाऱ्यावर न सोडता आगामी अक्कलकोट विधानसभा निवडणुकी करिता भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागणार — रमेश सिद्रामप्पा पाटील
विधानसभा राजकीय रणधुमाळी २०२४

भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी आपण त्यांना वाऱ्यावर न सोडता आगामी अक्कलकोट विधानसभा निवडणुकी करिता भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागणार — रमेश सिद्रामप्पा पाटील


*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*नेहमीच भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणारे कॉंग्रेसवाले भाजपात आले, त्यांना मात्र पाफडा व जिलेबी तर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांना शेंगाचे टरफल मिळाले..!, अशा परिस्थितीत भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी आपण त्यांना वाऱ्यावर न सोडता आगामी अक्कलकोट विधानसभा निवडणुकी करिता भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचे भाजपा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील यांनी सांगितले.*

गेल्या कांही वर्षात मतदार संघात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांची विविध माध्यमातून झालेली फरपट व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीशी भाजपा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील हे बोलत होते.

रमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, मतदार संघांचा विकासाचा अनुशेष भरून काढला जाणे गरजेचे आहे. विकासाच्या दृष्टीने विविध योजना, सिंचन योजना गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिला आहे. यामुळे मतदार संघातील शेतकरी हा वडिलोपार्जित जमीन कवडीमोलाच्या दराने सौर उर्जा कंपनीला दिली जात आहे. माझे वडील सहकार नेते माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

स्वामी समर्थ सहकार साखर कारखाना उभा करून मतदार संघातील उस उत्पादक शेतकऱ्यांना या माध्यमातून साथ दिली. मात्र साखर कारखाना हा निसर्गाचा लहरीपणा व कारखाना अधिकारी यांच्या संस्था अडचणीत आणण्याच्या भूमिकेमुळे सध्या कारखाना बंद असून, कारखाना सुरु व्हावा याकरिता माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अध्यक्ष संजीवकुमार पाटील हे कार्यरत आहे.
राज्य सरकारकडून आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मधून वगळले आणि मंगळवेढा- पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधी पॅनल कार्यरत असलेल्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या एन.सी.डी.सी यादीत घेण्यात आले. तर ६० दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या नजीकच्या जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या अध्यक्षांना भरघोष निधी देण्यात आलेला आहे.
याबाबत रमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, वास्तविक पाहता राज्य सरकार कडून सदरचा निधी देत असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मताधिक्यावर मार्जिन मनी लोन अवलंबून होते. मात्र तो स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत निकष लावण्यात आलेला नांही. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातून झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार राम सातपुते यांना सुमारे ४२०० मताधिक्य मिळाले होते.
मात्र मंगळवेढा- पंढरपूर या मतदार संघात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रसला मताधिक्य मिळाले. यासह आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात कार्यरत असलेल्या संत दामाजी सहकारी साखर कारखाना व ६० दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्याला भरघोष निधी देण्यात आलेला आहे. या लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार पराभव झाले आहे. तरी देखील या दोन्ही कारखान्याला मार्जिन मनी लोन यादीत समावेश करण्यात आला.
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्या बाबतची भूमिका का..? बदलली..! झारीतील शुक्राचार्य कोण..? असा सवाल करून रमेश पाटील यांनी मतदार संघात सध्या व्ही.के, एस.के, ए.के, एन.के, एस.एस, डी.बी, पी.पी, ए.पी, बी.एस आणि एस.पी यांचीच चालती पहायला मिळत आहे. सर्व सामान्य भाजप कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी कटिबद्ध असल्याचे रमेश पाटील यांनी सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक संघ राहण्याचे आवाहन करीत मै हु ना..! अशी भीम गर्जना करीत आगामी विधानसभा निवडणुकी करिता भाजपा कडून उमेदवारी मागणार असल्याचे रणशिंग रमेश पाटील यांनी फुंकले आहेत.