Akkalkot: रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटचा ७वा वर्धापनदिन साजरा

अक्कलकोट: रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटच्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त रॉबिन हूड आर्मी अक्कलकोटच्या टीम कडून झोपडपट्टी परिसरातील लहान मुलांना फळे व बिस्किट वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

मैत्री दिनानिमित्त अवचित साधून अक्कलकोट शहरात रॉबिन हूड आर्मी संस्था चालू,आज या संस्थेचे सात वर्ष पूर्ण होऊन आठव्या वर्षात पदार्पण झाले आहे.

रॉबिनहूड आर्मी सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष हिंदुरावजी गोरे आणि रविकांत जनशक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शहरात रॉबिनहूड आर्मी अक्कलकोट गेल्या सात वर्षापासून निस्वार्थ सेवा रॉबिनहूड आर्मीचे सदस्य काम करत आहेत.

रॉबिन हूड अक्कलकोटच्या माध्यमातून अक्कलकोट शहरातील अनेक गरजू बेगर मनोरुग्ण बेवारस अशा लोकांना अक्कलकोट शहरातील हॉटेल घरगुती कार्यक्रम लग्न समारंभ बर्थडे पार्टी आणि अन्य कोणतेही छोटे-मोठे कार्यक्रमात राहिलेला अन्न वाया न जाता गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम रॉबिनहूड आर्मी अक्कलकोट च्या माध्यमातून केली जाते.

रॉबिन हूड आर्मीचे रशिद खिस्तके, सोहेल फरास,समीर शेख, राम लोणारी,समर्थ घनाते यांनी अक्कलकोट शहरातील कित्येक बेवारस मनोरुग भिक्षू अशा अनेक लोकांचा उपचार सुद्धा करण्यात आला आहे व उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास मृतांच्या अंत्यविधी सुद्धा त्यांच्या परंपरेनुसार करण्यात आला आहे. तसेच दोन बेवारस मृत्यूचा शोध काढून त्यांच्या परिवाराला सुपूर्त करण्यात आले आहे.