तीर्थ येथे पुराण प्रवचनास भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ
———————————————
“श्रावणातील श्रवणाने जीवन आनंदमय होते”—बसवराज शास्त्री
श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)दि.५ मानवी मनाच्या चंचलतेमुळे मन अस्थिर बनते ,सुख हुलकावणी देते आणि सुखाच्या शोधात आपण भरकटतो.ख-या सुखाची खाण आपल्यातच आहे.हे साधुसंतांचा जीवन चरित्राच्या माध्यमातून कळते आणि आनंदाचा डोह सापडतो म्हणून पवित्र श्रावण महिन्यात देवादिकांच्या चरित्राचे श्रवण करावे असे आवाहन सोमेश्वर मठाचे वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी श्री रामलिंगेश्वर मंदिरात आयोजित साध्वी हेमरड्डी मल्लम्मा पुराण प्रवचन उद्घाटन प्रसंगी केले.
प्रारंभी श्री रामलिंगेश्वर व हेमरड्डी मल्लम्मा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी वेदमूर्ती सिध्दारुढ स्वामी, वेदमूर्ती मल्लय्या स्वामी, वेदमूर्ती रेवणय्या स्वामी यांच्या वेदघोषाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा डॉ भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, आयुष्यभर माणूस काही मिळवण्याच्या नादात भरकटत जातो.खरे समाधान केवळ परमेश्वराच्या भक्तिपूर्वक स्मरणात आहे याची जाणीव माणसाला श्रावणातील पुराण प्रवचनाच्या श्रवणातून प्राप्त होते
काशिनाथ बिराजदार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दारुढ स्वामी यांनी केले.सूत्रसंचालन संचालन व आभारप्रदर्शन प्रा. प्रभु लिंग वळसंगे यांनी केले
कार्यक्रमास देवस्थान पंच कमिटी सदस्य सिध्दाराम उदंडे, विश्वनाथ पावले, भीमाशंकर रोडगे, सिध्दाराम कुर्ले, रामप्रसाद बिराजदार,बसवराज भंगुरगे,महांतेश शेळगे ,शिवानंद कुर्ले,दयानंद कोरे, बसवराज कुर्ले अक्कन बळग मंडळाच्या भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री रामलिंगेश्वरांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!