गावगाथा

श्रावण मास निमित्त वागदरी येथे दानम्मा देवी पुराण कार्यक्रमात पाळणा उत्साहाने संपन्न 

श्रावण विशेष

श्रावण मास निमित्त वागदरी येथे दानम्मा देवी पुराण कार्यक्रमात पाळणा उत्साहाने संपन्न 

वागदरी अक्कलकोट उमराणी येथे जन्मलेल्या लिंगम्माने दानम्मा म्हणून प्रसिद्धी मिळवून, बसव कल्याण येथे जावून बसवेश्वर कडून दानाम्मा म्हणून घेत लोकउद्धार केली . इथे पुराणात वागदरीच्या मातांनी त्या दिवशी जन्मलेल्या लिंगम्माला पाळण्यात घालून जन्म दिनाच्या संभ्रमात साजरा केला हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे राजशेखर स्वामी म्हणाले
तालुक्यातील वागदरी येथे बुधवारी रात्री येथील महिलांनी श्रावण महिन्यानिमित्त हनुमान मंदिर येथे परमेश्वर पंच कमिटी व जागतिक लिंगायत महासभा शाखा वागदरी यांच्या वतीने आयोजित गुड्डापूर दानम्मा देवी पुराण कार्यक्रमात दानम्मा जन्मानंतर पाळणा सोहळा साजरा केला. स्वामीजी पुराणामध्ये पुढे बोलताना पुराण कथांमधील असे कार्यक्रम लक्षवेधी पद्धतीने सादर करून आपल्या गावाची संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम महिला करत असल्याचे स्वामीजी म्हणाले
पुराणात, राजशेखर श्रींनी दानम्मा देवीच्या जन्मदात्या पालकांबद्दल सांगितले आणि स्त्रियांना देवीच्या पाळणा कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. पाळणा कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य सांगितल्यावर सर्व महिलांनी एक एक करून साहित्य दिले. त्यानुसार महिलांनी पाळणा, अंथरूण, कपडे, कुलाई, लिंग, चांदीच्या बांगड्या, घागर यासह अनेक वस्तू आणल्या आणि पाळणा फुलांनी सजवला.
पुराणात आलेल्या प्रसंगानुसार जमलेल्या सर्व स्त्रिया एकत्र जमल्या, जगदेवी पोमाजी, कन्नड शाळेतील मुली, शिवशरणाय स्वामींनी जोगुळ गायला, तंगेम्मा ठोंबरे, कांताबाई पोमाजी, महादेवी कलशेट्टी, महादेवी मठपती, लिंगम्मा, लक्ष्मी, पार्वती यांच्यासह अनेक महिलांनी बाळाचे नाव ठेवले ठेवले. जमलेल्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला.
पंच कमिटीचे घळय्या स्वामी, जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव , परमेश्वर पोमाजी , अशोक पोमाजी, वागदरी शाखे चे सचिव शांतेश्वर कोटे, विजय निंबाळे, संजय मठपती, कल्लेणी हळीमनी, चंद्रकांत यमाजी, परमेश्वर मुनोळी, लक्ष्मीबाई पोमाजी, नागप्पा पोमाजी, पार्वती मठपती मल्लम्मा मठपती, श्वेता कणमुसे, इमला पोमाजी, सहित अनेक महिला वर्ग , मान्यवर उपस्थित होते. .
शिवशरणय्या स्वामी निंगदल्ली, प्रवीणा पांचाळ यांनी कार्यक्रमाला संगीत दिले.

वागदरी येथील हनुमान मंदिरात गुड्डापूर दानम्मा देवी पुराण कार्यक्रमात महिलांच्या हस्ते दानम्मा देवी पाळणा कार्यक्रम पार पडला. तंगेम्मा ठोंबरे, महादेवी कलशेट्टी, गंगाबाई पोमाजी, कांताबाई पोमाजी आणि अनेक महिला आहेत.

दानम्मा देवी पुराण कार्यक्रम मध्ये राजशेखर स्वामीजी. शिवशराणय्या स्वामी निन्गदल्ली आणि प्रवीण पांचाळ संगीत साथ देता आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button