गावगाथा

सध्या प्रत्येक भाविक आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहेत, माञ विनाकारण भटकंती न करता खास श्रावणमासात पौराणिक पुराणांचे श्रवण करुन आत्मज्ञान मिळवावे — मठाधिपती श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी

श्रावण मास विशेष

सध्या प्रत्येक भाविक आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहेत, माञ विनाकारण भटकंती न करता खास श्रावणमासात पौराणिक पुराणांचे श्रवण करुन आत्मज्ञान मिळवावे — मठाधिपती श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी

अक्कलकोट दि. ८- सध्या प्रत्येक भाविक आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहेत, माञ विनाकारण भटकंती न करता खास श्रावणमासात पौराणिक पुराणांचे श्रवण करुन आत्मज्ञान मिळवावे, असे प्रतिपादन मठाधिपती श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी

HTML img Tag Simply Easy Learning    

यांनी येथे केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

येथील श्रीशैल्य पीठाचे श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात श्रावणमास निमित्ताने आयोजित केलेल्या वेदमूर्ती
जगदिश्वरय्या
( संस्थान मठ, सन्नती ता. शेडम जिल्हा कलबुर्गी ) यांच्या रसाळ वाणीतून साध्वी हेमरड्डी मल्लम्मा यांच्या चरित्रावरील पुराणाच्या शुभारंभ प्रसंगी मठाधिपती श्री महास्वामीजी
बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

महास्वामीजी पुढे म्हणाले, भाविकांना जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर गुरुची आवश्यकता असते.अहंकार विरहीत नम्र सेवा जीवनाची वाटचाल सुखरूप करते. नम्रता ही जीवनाला शोभिवंत बनवते. आपल्या कर्माचे फळ आपणाला स्विकारावे लागते. विकारी वृत्तीने केलेल्या कर्माचे फळ दुःख देते. व सेवा वृत्तीने केलेल्या कर्माचे फळ सुख देते. संत संगती मध्ये ज्ञान प्राप्त होते. संगतीचा परिणाम कर्म करताना होतो. आज घडलेले सत्कर्म आपल्या भूतकाळातील कर्माची पावती असते.
सुखी जीवनासाठी म्हणून आप-आपल्या जीवनातील अंधार नाहीसा करायचा असेल तर चांगल्या विचारांची संगत व नम्रपणा ठेवली पाहिजे.चांगले विचार अंधार नाहीसा करतात. आणि नम्रपणा आपणाला पुढे नेतो, यामुळे जीवनाची वाट सोपी होते, असेही महास्वामीजी यांनी बोलताना सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या पुराणास अंबरीशकुमार देसाई ( कल्लूर) यांनी
तबला ची साथ तर श्रीशैल हडलगी यांनी हार्मोनियमची साथ देत आहेत.
प्रारंभी पुराणाचे संयोजक कल्लप्पा सोमेश्वर यांनी पुराणीक जगदिश्वरय्या यांचा परिचय करुन सत्कार केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या कार्यक्रमास तात्यासाहेब समाने, भिमाशंकर करकी, इरण्णा पाटील, शरणप्पा कुंभार, शिवानंद कुंभार, बाबुराव बिराजदार, मल्लिकार्जुन स्वामी, विजयकुमार हौदे, अनिल हत्ते, विठ्ठल कुंभार, मल्लिनाथ पाटील, चिदानंद कुंभार, बसवराज शास्त्री, ओंकार ग्रामोपाध्ये, योगेश कुंभार, गंगाधर कुंभार,
रेणुकाचार्य अक्कन बळग, कुंभार समाज महिला मंडळ व असंख्य भक्तगण उपस्थित होते.
———————————————-समाप्त
फोटो ओळ- अक्कलकोट — येथील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात श्रावणमास निमित्ताने आयोजित पुराणाचा शुभारंभ प्रसंगी मठाधिपती श्री. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी, पुराणीक जगदिश्वरय्या व भक्तगण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button