गावगाथा

संत चोखामेळा व संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतीशील जागर पैठण नगरीत होणे मराठवाड्यासाठी भूषणावह – कौतिकराव ठाले पाटील

साहित्य संमेलन

संत चोखामेळा व संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतीशील जागर पैठण नगरीत होणे मराठवाड्यासाठी भूषणावह – कौतिकराव ठाले पाटील…

HTML img Tag Simply Easy Learning    

छत्रपती संभाजीनगर – संत चोखामेळा अध्यासन केंद्र, वृंदावन फाऊंडेशन, पुणे आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 च्या फलकाचे (पोस्टरचे) अनावरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या शुभहस्ते मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, समता वारी संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा. अलका सपकाळ, प्रा. ज्ञानोबा सपकाळ, आनंद असोलकर, पैठणच्या नियोजित संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संतोष तांबे, संयोजन समितीचे विष्णू ससाणे, कैलास मुके आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेची जननी
असलेल्या प्राचीनतम तीर्थक्षेत्र पैठण नगरीत होत असलेले संत चोखामेळा साहित्य संमेलन हे संत एकनाथांच्या समन्वयवादी विचारांचे अधिष्ठानरुप ठरेल. संत चोखामेळा व संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतीशील जागर पैठण नगरीत होणे मराठवाड्यासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन पुढे बोलतांना ठाले पाटील यांनी केले.
दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 च्या
बोधचिन्हांचे अनावरण देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी धाराशिव शहरातील संत मुक्ताबाई मंदिरात
संत मुक्ताबाई यांच्या परम भक्त, अभ्यासक व त्यांच्या विचार कार्याच्या प्रसारक मंगलताई वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

“सोयराबाई : संत, कवी आणि माणूस” असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र पैठण येथे शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबरला संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, संत साहित्य प्रदर्शन, उद्बबोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. सदरील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे असणार आहेत.

दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी शुभेच्छा देत मराठवाडा साहित्य परिषद आपल्या सोबत असल्याचे सांगितले. प्रा.अलका सपकाळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा.संतोष तांबे यांनी प्रास्ताविक तर विष्णू ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button