कोळेकरवाडी नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी कायम उभी राहिली आहे. या वाडीच्या विकासासाठी आपण कटीबद्द : आमदार सचिन कल्याणशेट्टी
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील संपन्न झाला.

कोळेकरवाडी नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी कायम उभी राहिली आहे. या वाडीच्या विकासासाठी आपण कटीबद्द : आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट, दि.24 : कोळेकरवाडी नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी कायम उभी राहिली आहे. या वाडीच्या विकासासाठी आपण कटीबद्द आहोत असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

ते कोळेकरवाडी नं.1 येथील प्लॉट नं.44 येथे जय हनुमान गणेश व नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्यावतीने आयोजित नवरात्र महापूजाप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी, कोळेकरवाडीने ज्याप्रमाणे साथ दिली आहे. त्याप्रमाणे भविष्यातही कायम राहो. वाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. ग्रामस्थांच्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता कटीबद्द असल्याचे आमदार कल्याणशेट्टी म्हणाले.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, बाळासाहेब भोसले, संजय भोसले, माजी सरपंच अबुबकर शेख, इरफान शेख, रवि राठोड, माजी पं.स.सदस्य राजकुमार बंदीछोडे, माजी उपसरपंच लक्ष्मण डांगे, कृषी सेवा केंद्राचे तुकाराम मोरे, शंकरराव साबळे, महादेव निकम, भगवानराव खरात, अंबादास डांगे, उत्तम घावटे, अंबादास शहापूरे, श्रीमंत पालकर, सुरज खरात, साहेबराव खरात, बिरदेव कोळेकर, गोविंद क्षिरसागर, बाळासाहेब खरात, गणेश नरवडे, अण्णा बंडगर, जयवंत कोळेकर, राजकुमार कृष्णात खरात, मधुकर क्षिरसागर, चिदानंद निकम, सुनिल शिंदे, राठोड काळेगाव, दत्ता शहापुरे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थत बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील संपन्न झाला.
