
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा..

अक्कलकोट: महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय व मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूवंद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रथम स्वामी समर्थ व दत्तात्रय तसेच संस्थापक कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांकडून उपस्थित सर्व मराठी,कन्नड व सेमी इंग्रजी शिक्षकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ऐश्वर्या माळी, दानेश्वरी बगले, धनेश्वरी बिराजदार, प्रीती फुलारी या मुलीनी सुंदर समुहनृत्य सादरीकरण केले. स्नेहा देडे, अंतरा चौगुले, संस्कृती शिरसागर, अक्षरा साठे, आफरीन शेख, कोमल कोरे, सिद्धी होटकर, समृद्धी चौगुले, अल्फीया शेख, धनेश्वरी घंटे, महेश्वर स्वामी, सोमनाथ भुरले, शुभांगी पाटील, विजयालक्ष्मी हिळ्ळी, रणवीर टोणपे, पल्लवी सोलंकर, सुमया शेख या विद्यार्थ्यानी भाषण करताना गुरूंबद्दल महती सांगून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केले.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सीईओ रूपाली शहा, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पूनम कोकळगी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप,प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेवानिवृत्त शिक्षक खंडेराव घाटगे, सेवानिवृत्त पर्यवेक्षक शिवानंद पुजारी, पर्यवेक्षक सुरेश रूगे, आदी मराठी, कन्नड, सेमी विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रज्ञा दसाडे हीने केली. सूत्रसंचलन कु. वैष्णवी टपाले यानी केले तर कु.भाग्यश्री बिराजदार ही सर्वांचे आभार मानले.

चौकटीतील मजकूर

गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.

एकाही विद्यार्थ्यांस शिक्षकानी भाषण लिहून दिले नव्हते, तर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषण करण्यासाठी पुढे येत होते.