Akkalkot: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतले सहकुटूंब स्वामींचे दर्शन

अक्कलकोट (प्रतिनिधी ): दि.१६, महाराष्ट्र शासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी तानाजी सावंत कुटुंबियांचे स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री सावंत यांनी महेश इंगळे व त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समिती कार्याचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. स्वामी समर्थांच्या या सेवाकार्याचा विस्तार भविष्यातही असेच वाढत राहून येणाऱ्या काळात सर्व स्वामी भक्तांच्या स्वामी दर्शनाची आस पूर्ण करणेकामी यापेक्षाही आणखी उत्तम नियोजन करून भाविकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरविणे तसेच अक्कलकोट व स्वामी दर्शनाची ही यात्रा सुखी व समाधानी व्हावी असं सेवाकार्य करण्याचे बळ महेश इंगळेंना व प्रथमेश इंगळे यांना स्वामी समर्थांनी द्यावे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ मुमूडले, विपूल जाधव, मोहन शिंदे व भाविक भक्त उपस्थित होते.
