गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : वागदरी जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): वागदरी येथील जि.प‌. प्राथमिक मराठी मुला- मुलींच्या शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक सौ रेखा सोनकवडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सुरवसे हे होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बुद्धिवंत पब्लिकेशन मंगळवेढा जि. सोलापूर यांच्याकडून २०२३ – २४ राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत अक्कलकोट केंद्र वागदरी मुलींची शाळा इ. ३ री कु ओजस्वी अमोल बोराळे हि केंद्रांत दुसरी आल्याबद्दल मानचिन्ह व रोख रक्कम (बक्षिस) सरपंच श्रीकांत भैरामडगी उपसरपंच पंकज सुतार ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव यांच्या शुभहस्ते देण्यात आले या कार्यक्रमात ध्वजारोहण भाषणे व विद्यार्थी विविध कला सादर केले वागदरी येथील सुपुत्र नांव न घोषित करता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पुंडे ( खाऊं) देले .

HTML img Tag Simply Easy Learning    

तसेच ग्रामपंचायत कडून व उपस्थित मान्यवर पालक यांच्या कडून विद्यार्थ्यांना खाऊं व वही वाटप करण्यात आले त्याप्रसंगी सरपंच श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच पंकज सुतार, माजी उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव शारदाबाई रोटे, शिवसेना विभागप्रमुख मुगेद्र मुदिनकेरी, माजी तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव, सेवा निवृत्त कर्मचारी देवांग कोणजी, चंद्रशेखर माने मुंबई पोलीस, श्रीशैल भरमदे, महादेव सोनकवडे, बाळू पोमाजी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सुरवसे, शिक्षण प्रेमी शिवशरणप्पा सुरवसे ( अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ता. अक्कलकोट), बोळेगाव येथील शाहाजी सुरवसे, घोळसगाव येथील नरेंद्र त्रिगूळे, सोमा स्वामी, इसुफ नदाफ,व पालक, शिक्षिका कलशेट्टी टी,  रेऊरे , कुणाले , गिरी , फंड , पोषण आहार बनविणारे महिलां विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सूत्रसंचालन बाबासाहेब बनसोडे सर यांनी केले. आभार बागवान सर यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button