गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: आळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, कन्नड , उर्दु शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी ): स्वातंत्र्य दिनाच्या भारत माता की जय, वंदे मातरम् जय जयकार करत संपुर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ट नेता महादेव सत्यप्पा पाटील , उपअध्यक्ष म्हणून व्हनप्पा कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री संतोषकुमार चराटे यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतीमेचे पुजन केले, तंटा मुक्ती अध्यक्ष शरणप्पा सदाशिव माळगे यांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ध्वजा कट्याचे पुजन सरपंच महातेंश हत्तुरे यांनी केले.

 शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गड्डेप्पा शिवयोगी कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली.सर्व प्रमुख मान्यवरांच्या स्वागतासाठी विद्याथर्यंनी स्वागत गीत सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री अखलाख शेख सर यांनी प्रास्ताविक भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून शाळेचा लेखाजोखा मांडला.विद्यार्थांनी रोमहर्षक व अतिशय शिस्तबद्ध संगीत कवायतीने उपस्थितांचे मन जिंकले.

सेट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठी शिक्षक श्री शिवानंद कोळी सर यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले. इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत तडवळ केंद्रात प्रथम क्रमांक मिळविलेल्या समर्थ कोरे, दुसरा अश्वर्या स्वामी आणि तृतीय क्रमांक मलिकार्जुन हत्तुरे विद्यार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

 

या कार्यक्रमाला उपस्थित: शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गड्डेप्पा कोरे, उपअध्यक्ष  संतोष चराटे, सरपंच महातेंश हत्तुरे, उपसरपंच रियाज मुल्ला, तटांमुक्ती अध्यक्ष शरणप्पा माळगे, सलीम पटेल, रुकुमोदीन कुमटे, गुरुशांत माळगे, परमेश्वर कोळी , इरणा चराटे, महेश कुंभार,श्रीशैल माळगे, तलाठी गणेश गायकवाड साहेब, कोतवाल औदुसिद्द पुजारी, बसवराज सुतार यांनी सर्व मुलाना गोड खाऊ वाटप केले. निजाम कुमठे, रजाक मुल्ला, समीर मुला, सचिन चलगेरी, अमोगी पुजारी, सोनु पाटील, संजयकुमार सुतार, शिवबाळ ऐवळे, ससेच माराठी, कन्नड, उर्दू शाळा सर्व शिक्षक वृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन श्री शिवशंकर हत्तुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवानंद कोळी सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button