गावगाथा

शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय अग्निवीर कार्यशाळा संपन्न

दिनविशेष

शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय अग्निवीर कार्यशाळा संपन्न
(मुरुम प्रतिनीधी)

दि जुलै रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभाग व 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अग्निवीर कार्यशाळा घेण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले हे होते . त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अग्निवीर भरती बदल विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, शारीरिक , मानसिक, बौद्धिकतेकतेची तयारी करूण चांगले अध्ययन करून भरतीची तयारी करावी असे सांगितले . धाराशिव जिल्ह्यात शिवाजी महाविद्यालय एकमेव असे आहे जे की अकरावीच्या मुलांना, मुलींना एनसीसी मध्ये प्रवेश देऊन त्यांना त्याबदलचे परिपूर्ण शिक्षण देऊन कॅडेटसची योग्य ती तीन वर्षाच्या कालखंडात तयारी करून घेते . तरुणांनी भरती होऊन देशाची सेवा करावी असे सांगितले . कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक नायब सुभेदार बाजीराव पाटील यांनी अग्निवीर भरती कोणत्या उदेश्याने ही योजना भारत सरकारने सुरु केली त्या मागचा इतिहास काय कारण अग्निवीर योजनेचा कार्यकाल हा चार वर्षाचाच आहे या कार्यकाळात त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा घेऊन तो किती सक्षम आहे व तो सेवेत कायम ठेवायचा कि नाही याबदल किती जणांना सेवेत ठेवयाचे सेवा पूर्ण झाल्या नंतर त्या युवकांना रोजगाराची शासणानी कोणत्या क्षेत्रात त्यांना नौकरीच्या संधी उपल्बध करून दिल्या आहेत त्याबदलचे अतिशय सखोल अशी माहिती या कार्यशाळेतुन विद्यार्थ्याना देण्यात आली .

अग्निवीर भरती साठी लागणारी सर्व कागदपत्रे ,पात्रता, अटी शारीरिक ,मैदानी, शैक्षणिक, सैन्य दलातील वेगवेगळी पदे व बढती, पदोन्नती या बदल विद्यार्थी व कॅडेटसना संपूर्ण असे मार्गदर्शन केले एनसीसीचे बी व सी प्रमाणपत्र पूर्ण केल्या नंतर त्याचा सैन्य दलात होणारे फायदे या बदलची माहिती या कार्यशाळेतुन देण्यात आली . अग्निवीर योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा असे यावेळी पाटील सरांनी सांगितले या कार्यशाळेत एकुण 120 कॅडेटस उपस्थित होते. कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी प्रास्ताविक , कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कॅडेट वैष्णवी कांबळे आभार कॅडेट भूमिका शेंडगे हिने केले . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये हवलदार सुभेदार काळे सुनिल , डॉ भरत शेळके भारत विद्यालयाचे संदिप चव्हाण सर्व कॅडेटस ,प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button