
माजी सैनिक चंद्रशेखर सावंत यांना पुरस्कार प्रदान…
पूनम पाटगावे…मुंबई प्रतिनिधी…मीरा रोड येथे राहणारे माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नुकतेच पश्चिम रेल्वे च्या सेवेतून मोटरमन म्हणून निवृत्त झालेले चंद्रशेखर सावंत यांना आदर्श सैनिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.वांद्रे येथील नॅशनल लायबरित प्रजासत्ताक अमृतगौरव पुरस्कार समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेकांचा पुरस्कार देऊन बाळासाहेब तोरसकर, डॉ माळवे, डॉ यादव, नागेश हुलवळे, प्रमोद सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.२०१८ साली अंधेरी गोखले ब्रीज ट्रेन वर पडण्यापासून सावंत यांनी अनेकांचे प्राण वाचविले होते.आपल्या ३३ वर्षाच्या रेल्वे सेवेत असताना देखील त्यांना अनेक पुरस्कार याआधी मिळालेले आहेत. सध्या ते जॉय ऑफ गिवींग या संस्थेच्या माध्यमातून स्मजिक कार्यात अग्रेसर असून अनेक ठिकाणी मदत घेऊन जात असतात.हा पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
