हन्नूरच्या अनंत चैतन्य प्रशालेच्या मुलां- मुलींचा दहीहंडी कार्यक्रम उस्फुर्त सहभागासह संपन्न——
—————————————- विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी झाला.व श्रीकृष्णाला दही, दुध, लोणी खुप आवडत असे.मात्र माय यशोदा कृष्णापासून दह्याचे रक्षण करण्यासाठी हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे व यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. याची आठवण म्हणून श्री कृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा ( गोपाळ काला) उत्सव सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा केला जातो.याच धर्तीवर महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, हन्नूर येथे हा दहीहंडी चा कार्यक्रम अत्यंत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ज्याला सर्व वर्गाच्या संघानी उस्फुर्त सहभागासह भरभरून प्रतिसाद दिला. प्रारंभी प्रशालेचे सन्माननिय मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांच्या हस्ते बाळ श्री कृष्ण मुर्ती च्या प्रतिमेचे पुजन करून उत्सवास सुरुवात करण्यात आली.याक्षणी “श्री कृष्ण- राधा” च्या वेशभूषेतील निशांत बाळशंकर व नंदिनी रोट्टे अतिशय विलक्षण दिसत होते. या दहीहंडी कार्यक्रमाच्या सुरूवातीला कु. शिवानी बाळशंकर,कु. सायली पवार व समुह,कु. भक्ती स्वामी व समुह,कु.ऐश्वर्या घोडके व समुहानी अनुक्रमे “वो किसना है”,अच्युतम् केशवम् माधवम्’ , ‘कृष्ण जन्मला ग बाई’, ‘मैय्या यशोदा’ या विशिष्ट अशा गाण्यावर सुंदर नृत्य केल्या. यानंतर या उत्सवात पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलां- मुलींनी बनवलेल्या प्रत्येक संघाने मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा छान प्रयत्न केला. मात्र यात दहावीच्या कु. करुणा हेगडे च्या संघाने तर याच वर्गातील कुमार बाबुराव यादव च्या संघाने बाजी मारली.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी “गोविंदा आला रे आला”असा एकच जल्लोष केला. या विजेत्या संघाला मुख्याध्यापक श्री.अशोक साखरे यांच्या वतीने रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.हा दहीहंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक श्री.ज्ञानदेव शिंदे,सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. अप्पासाहेब काळे, सहाय्यिका सौ. स्वप्नाली जमदाडे, सहशिक्षक श्री.धनंजय जोजन,सुरेश जाधव,राजेंद्र यंदे, शशिकांत अंकलगे,अब्दुल अजीज मुल्ला,काशिनाथ पाटील, स्वामीनाथ कोरे, शिवप्पा घोडके यांनी खूप परिश्रम घेतले तर सरदार मत्तेखाने, शहाजी माने, रवींद्र कालीबत्ते,रमेश शिंदे, मृदुलादेवी स्वामी,जैनुद्दीन जमादार यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.या दहीहंडी कार्यक्रमाच्या आनंददायी उत्सवाच्या चांगल्या पद्धतीने केलेल्या नियोजनाबद्दल शिक्षकांचे व या साहसी खेळात उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या व जिंकलेल्या सर्व मुलां- मुलींचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार मा. सचिन कल्याणशेट्टी,जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा. मल्लिनाथ कल्याणशेट्टी,माजी प्राचार्य व आधारस्तंभ मा.सिध्देश्वर कल्याणशेट्टी,मा.संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी,उपसरपंच व युवा नेते मा.सागर कल्याणशेट्टी , संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती,सी.ई.ओ.सौ.रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी कौतुकासह अभिनंदन केले.