श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे धार्मिक उपक्रमातील योगदान कौतुकास्पद – आ.पंकजाताई मुंडे
आ.पंकजाताई मुंडे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सचिनदादा कल्याणशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी व अन्य दिसत आहेत.

श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे धार्मिक उपक्रमातील योगदान कौतुकास्पद – आ.पंकजाताई मुंडे
(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट)

(दि.२७/८/२४) — श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक क्षेत्रातील योगदान हे कौतुकास्पद असल्याचे मत
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य व राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार पंकजाताई मुंडे यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी पंकजाताई मुंडे बोलत होत्या. पुढे बोलताना आमदार पंकजाताई मुंडे यांनी मंदिर समितीच्या वतीने वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात हे माझ्या ऐकीवात असून यामुळे समाजात भक्तीप्रबोधनाचा प्रसार होत आहे. याबद्दल भक्तांमध्ये धार्मिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल असे वक्तव्य करून वटवृक्ष मंदिरातील स्वच्छता व प्रसन्न वातावरण याबद्दलही समितीचे कौतुक केले. याप्रसंगी तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे, अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पी.आय.राजेंद्र टाकणे, आदींसह भारतीय जनता पार्टीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ – आ.पंकजाताई मुंडे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सचिनदादा कल्याणशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी व अन्य दिसत आहेत.
