जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा घोळसगाव येथे जगदंबा प्रतिष्ठान घोळसगाव यांचे तर्फे “चला सावली वाढवूया” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम
वृक्षारोपण

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा घोळसगाव येथे जगदंबा प्रतिष्ठान घोळसगाव यांचे तर्फे “चला सावली वाढवूया” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
येथील — कैलासवासी भारतबाई मल्लिनाथ होळे यांचे स्मरणार्थ श्री संजय मल्लिनाथ होळे यांचे कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. जगदंब प्रतिष्ठानचे वतीने शोचे विविध रोपे शाळेला देण्यात आले व तसेच श्री संजय होळे यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यास एक वही त्यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे गावचे युवा सरपंच राजशेखर किवडे हे होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आले प्रतिमेचे पूजन शशिकांत साळुंखे सर व राजशेखर कीवडे यांच्या हस्ते संपन्न झाले व तसेच त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला सुरुवातीला वृक्षाचे पूजन उमेश भाऊ साळुंखे यांच्या हस्ते करून सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध शोचे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रम चे सूत्रसंचालन अजित ठाकर सर यांनी केले विद्यार्थ्यांना शशिकांत साळुंखे सर व इरण्णा आलुरे सर यांनी आपले मनोगतनातून वृक्षांचे महत्त्व पटवून दिले कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचे किती महत्त्व होतं हे देखील पटवून सांगितले वृक्ष आपल्याला ऑक्सिजन निर्मिती करून देते आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन भेटण्यासाठी तरी वृक्षांचे लागवड करून संगोपन करायला पाहिजे असे व्यवस्थितपणे शशिकांत साळुंखे सर यांनी भाषणातून व्यक्त केले कार्यक्रमाला गावचे सरपंच राजशेखर कीवडे, इरण्णा आलूरे सर, शशिकांत साळुंखे सर, स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष संजय जी होळे, युवा नेते अशोक जी वर्दे, शाळेसाठी काम धडपडणारे सहकार्य करणारे उमेश आप्पा साळुंखे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशील कुमार फुलारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक श्री सोमनाथ जी मोरे सर यांनी केले कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी अमोल जी गुंजोटे सर, रामेश्वर दरेकर सर,अजित ठाकर सर, वागदरकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले
