श्री स्वामी समर्थ समाधी मठात त्रिपुरारी पौर्णिमाचा मुख्य सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांने मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा
सुमारे २५ हजार हून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे धनंजय महाराज यांनी बोलताना सांगितले.

अक्कलकोट, दि.१५-
येथील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात
त्रिपुरारी पौर्णिमाचा
मुख्य सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांने मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात
साजरा करण्यात आले. या निमित्ताने श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज धनंजय महाराज व भक्त परिवार यांच्या तर्फे श्री समाधी मठात आकर्षक
फुलांची सजावट करण्यात आली होती. ही सजावट
धनंजय महाराज व स्वामी भक्त परिवार यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.

सदरची नयनरम्य सजावट सेवेसाठी २५ हून अधिक प्रकारच्या विविधरंगी सुगंधी देशी- विदेशी फुलांसह करण्यात आली होती. यासाठी पांढरी शेवंती, भगवा झेंडु, पिवळा झेंडू, अष्टर,अशोकाची पाने, निशिगंधा, गुलाब, लिलीयम,परपल ऑर्कीड व्हाईट ऑर्कीड, ऑथोरियम,कार्नेशन, ब्लु डेजी, पिंक डेजी, तगर, चापा, कागडा,कमिनी, शेवंती, ऑर्कीड, गुलटॉप, गुलछडी, ब्लु टॅटस, व्हाईट टॅटस, जिप्सो, तुळशी, विड्याची पाने,कामीनी, कमळ ग्लॅडीओ आदी प्रकारची फुले व पाने वापरुन समाधी मठाचे गाभाऱ्यासह मंडप, महाद्वार, स्वामी सभामंडप,
सर्वत्र एका पेक्षा एक नेत्रदीपक अशी फुलांची सजावट करण्यात आली असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत होते.
फुलांची सजावट करण्यासाठी सुमारे १५ कामगार व भक्त मंडळांनी परिश्रम घेतले.

प्रारंभी शुक्रवारी पहाटे काकड आरती करुन भाविकांना दर्शनासाठी मठ खुले करण्यात आले. दिवसभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २५ हून अधिक पालखी मठाला भेट दिली. या सर्व पालखीचे स्वागत मठाच्या वतीने करण्यात आले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. दिवसभर मठात नैवेद्य आरती, सायंकाळची आरती करण्यात आली. त्यानंतर शेकडो पणती लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. श्री चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत मोठी रांग लागली होती. परगावहून आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले. सुमारे २५ हजार हून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे धनंजय महाराज यांनी बोलताना सांगितले.

या सोहळ्याप्रसंगी पुजारी परिवार उपस्थित होते.
