गावगाथा

विध्यार्थ्यांची आई व्हा, शिक्षिका नको – सौ. संगिता शहा

के. नागसुंदरी यांना यंदाचा “बेस्ट ग्लोबल टीचर पुरस्कार” प्रदान

विध्यार्थ्यांची आई व्हा, शिक्षिका नको – सौ. संगिता शहा
=================================
के. नागसुंदरी यांना यंदाचा “बेस्ट ग्लोबल टीचर पुरस्कार” प्रदान
=================================

कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, बोरामणी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. संगिता शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, विद्यार्थ्याना आईच्या मायेने शिकवा आणि घडवा तरच एक आदर्श व संस्कारी पिढी घडेल. शिक्षकांना अशी मुलं घडविण्यासाठी त्यांची केवळ शिक्षिका नाही तर आई व्हावी लागेल.

“के. नागसुंदरी यांना बेस्ट ग्लोबल टीचर पुरस्कार प्रदान”
कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नात्याविषयी विचार मांडले. त्यांनी सांगितले, “शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एकसूत्रीपणा आला की, त्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये एक अतूट नातं तयार होतं, ज्यातून खरा शिक्षक सिद्ध होतो.” याच तत्वांना अनुसरून, यंदाचा ‘ग्लोबल बेस्ट टीचर’ पुरस्कार प्री-प्रायमरी विभागाच्या सौ. के. नागसुंदरी यांना मागील अनेक वर्षांत केवळ विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. संस्थेच्या सचिवा सौ. संगीता शाह व खजिनदार सौ. सुजाता बादोले यांच्या हस्ते सन्मानपत्र, शॉल, बुके आणि पुरस्काराची रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील एक दिवसाचा कारभार आपल्या हाती घेतला आणि उत्साहात शिक्षक दिन साजरा केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश साळुंके, साबीर शेख आणि कु. सानिका जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. ऐश्वर्या धनुरे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सोनाली मुदकन्ना, प्रियांका बिराजदार, अमृता कोरीशेट्टी आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button