गावगाथा

न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात रविवारी रोजी सायंकाळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांच्या हस्ते पूजन

दि. ९ सप्टेंबर रोजी सोमवारी सायंकाळी ७ वा. न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते श्रींची पूजन होणार आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात रविवारी रोजी सायंकाळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

सालाबादाप्रमाणे यंदाही श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरील पुजा ही सोमवार दि. १६ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. शमीवृक्षाखाली गेल्या ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

याप्रसंगी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांचा न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कु.हर्षवर्धनराजे भोसले, कु.स्वामिनीराजे भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, कैलास वाडकर, मनोज निकम, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, वैभव मोरे, पो.कॉं. संदीप सोमवंशी, वीरभद्र कोलाटी, रोहन शिर्के, आप्पा हंचाटे, निखील पाटील, भारत पाटील, अतिश पवार, गोटू माने, प्रविण घाटगे, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, धानप्पा उमदी, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, संभाजीराव पवार, पिंटू साठे, दत्ता माने, गणेश पाटील, शिवू काळे, राहुल इंडे, प्रसाद हुल्ले, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, सागर पवार, अनिल गवळी, पप्पू कोल्हे, सोमनाथ शिंदे, संतोष लकशेट्टी, किरण साठे, विशाल कलबुर्गी, फहीम पिरजादे, योगेश कटारे, कन्हय्या झंपले, दिनेश काळे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर,विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट :
दि. ९ सप्टेंबर रोजी सोमवारी सायंकाळी ७ वा. न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते श्रींची पूजन होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button