गावगाथा

विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवावे…. प्रा. डॉ. महेश मोटे

लालबहादूर शास्त्री विद्यालयात कै. तिमण्णप्पा जमादार यांच्या स्मृति दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. महेश मोटे, राजेंद्र जमादार, जगदीश जमादार, बाबुराव पाटील व अन्य.

विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवावे…. प्रा. डॉ. महेश मोटे

मुरूम, ता. उमरगा, ता. २४ (प्रतिनिधी) : आपल्या देशाला महापुरुषांचा विचारांचा वसा आणि वारसा लाभलेला आहे. त्यांचे विचार घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. तरुणच उद्याचे भविष्य असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. बेळंब, ता. उमरगा येथील महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित संस्थापक अध्यक्ष कै. तिमण्णप्पा जमादार यांच्या १७ व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २४) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जमादार होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव राजेंद्र जमादार, माजी पोलीस पाटील बाबुराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शब्बीर नदाफ, मुरूमचे सामाजिक कार्यकर्ते महावीर नारायणकर, शिवराय सपळे, सुर्यकांत सुर्यवंशी, श्रीमंत गायकवाड, श्यामसुंदर बोडरे, शिवाजी जमादार, संस्थेच्या संचालिका अर्चना जमादार, पार्वती जमादार, श्रीकांत कारभारी, मुख्याध्यापक शंकर आसबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, अलीकडच्या काळात कोणीही कोणांच्या फारशा जयंत्या अथवा पुण्यतिथ्या करत नाहीत. तेव्हा समाजातील अशा आदर्श व्यक्तींचे व्यक्तिमत्व वाचून व आत्मसात करून स्वतः अंगीकारले पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेले चांगले गुण समाजात वावरताना ते वापरले पाहिजेत, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी इयत्ता दहावीमधून गुणानुक्रमे आलेल्या गुणवंत विद्यार्थीनी कुमारी स्नेहल बंदीछोडे, गायत्री गुरव, ओंकार बंदीछोडे, आलिया शेख व श्रुती सुर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाबुराव पाटील यांनी संस्थेप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. बशीरअहमद नदाफ, तानाजी जाधव, निर्मला कोरे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर आसबे यांनी केले. सूत्रसंचालन परशुराम कळपे तर आभार अकुंश पाटील यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

फोटो ओळ : बेळंब, ता. उमरगा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात कै. तिमण्णप्पा जमादार यांच्या स्मृति दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. महेश मोटे, राजेंद्र जमादार, जगदीश जमादार, बाबुराव पाटील व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button