गावगाथा

प्राध्यापिका ललिता लवटे यांना साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कर जाहीर…

पुरस्कार

प्राध्यापिका ललिता लवटे यांना साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कर जाहीर…

कूरनूर:शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अक्कलकोट यांच्या कडून तालुकास्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील खेडगी महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्राध्यापिका ललिता लवटे यांना जाहीर झाला आहे.दरवर्षी साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करते यावर्षी देखील या पुरस्काराचे वितरण होणार असून हा पुरस्कार अकरा जणांना देण्यात येणार आहे.यंदा या पुरस्काराचे मानकरी प्राध्यापिका लवटे ठरले आहेत त्यांचा सत्कार मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथे 15 सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.सत्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ,हार,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,व श्यामची आई पुस्तक असे असणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या सह आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.गेल्या पाच वर्षापासून ते खेडगी महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.ललिता लवटे हे उच्चशिक्षित असुन अकरावी बारावी यासह सीनियर कॉलेजला देखील ते मार्गदर्शन करतात.तसेच विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षिका म्हणून त्यांची ओळख महाविद्यालयामध्ये आहे विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ते सदैव कटिबद्ध असतात विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून असल्याने आणि विद्यार्थ्यांचा सहवास असल्याने विद्यार्थी देखील त्यांच्याकडे तितकेच आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या कामाची ख्याती बघून शाखेने हा त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे.

 

पुरस्कार संस्थेला आणि विद्यार्थ्यांना समर्पित

पुरस्कारा बद्दल लवटे यांना विचारले असता शिक्षक हा समाज घडवण्याचे काम करत असतो आणि ते मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे कदाचित मला हा पुरस्कार मिळाला असेल आणि हा पुरस्कार मला यापुढे देखील काम करण्यासाठी ऊर्जा देईल आणि या पुरस्कराचा मी आदरपूर्वक स्वीकार करते आणि हा पुरस्कार संस्थेला आणि विद्यार्थ्यांना समर्पित करते आणि यापुढे देखील अशाच पद्धतीने काम करेन असे आश्वासन यावेळी ललिता लवटे यांनी दिले.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लवटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button