गावगाथा

पुणे लोकसभा बूथ प्रमुख आणि पदाधिकारी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात….

पुणे लोकसभा बूथ प्रमुख आणि पदाधिकारी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात….

भारतीय जनता पार्टी पुणे लोकसभा बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री मा.श्री. ब्रजेशजी पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झाले. संमेलनात मा.श्री. ब्रजेशजी पाठक यांनी सर्वांशी संवाद साधून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले.

पुणे लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आणि पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार या संमेलनत करण्यात आला. मोदी सरकारची कामगिरी, गरिब कल्याणाच्या योजनांमुळे सामान्यांचं सुखकर होत असलेलं जीवन, देशात सुरु असलेली विकासकामे यासह विविध बाबींचा आढावा उपमुख्यमंत्री श्री. पाठक यांनी भाषणात घेतला.

‘आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपासाठीच नाही, तर देशाच्या भविष्यासाठीही महत्त्वाची आहे. त्यासाठी भाजपाच्या प्रत्येक घटकाने वास्तवाचे भान ठेऊन आपलं योगदान द्यावे आणि पंतप्रधान मा. मोदीजींना पंतप्रधान करताना पुणे लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पडावे, यासाठी एकजूटीने लढण्याचे आवाहन मी यावेळी संबोधित करताना केले.

शहराध्यक्ष धीरजजी घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, शहर प्रभारी माधवजी भांडारी, संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार सुनीलभाऊ कांबळे, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, दिलीपभाऊ कांबळे, जगदीश मुळीक, सुनील देवधर, प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, श्रीनाथ भीमाले, गणेश बिडकर, हेमंत रासने, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, सरचिटणीस पुनीत जोशी, बाप्पू मानकर, रवी साळेगावकर, राहुल भंडारे, वर्षाताई तापकीर, राजेंद्र शिळीमकर तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष करण मिसाळ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे व ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे यांच्यासह शहर पदाधिकारी, विधानसभा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button