गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: अक्कलकोटमध्ये ‘हिंदू जन आक्रोश’ मोर्चेला विराट गर्दी ; लाखो हिंदू भाविकांच्या सेवेपेक्षा आमदारकी मोठी नाही – आमदार कल्याणशेट्टी़ंचे खडेबोल 

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट बसस्थानक वॉल कंपाउंडमधून पायवाट सोडण्याचे मागणीला विरोध दर्शवत आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर बसवलिंग म्हास्वामीजीं, नीलकंठ म्हास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार संग्राम जगताप होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांने राज्यातील विविध ठिकाण झालेले अतिक्रमण हटवले जातील. याबरोबरच अक्कलकोट एसटी स्टैंडपाठी मागील अतिक्रमणसुद्धा उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे वादग्रस्त रस्ता देण्याचे प्रश्नच येत नाही, असे परखड मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

 

    लव्ह जिहाद बंद करण्यासाठी आई-वडिलांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. मुलींना, महिलांना ब्लॅक मेलिंग करून फसवले जाते. पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई वेळीच करावी. धर्मांतरासाठी प्रत्यन करणारेना ठोकून काढा. धर्मांतर विरोधी कायदा वेळीच झाला पाहिजे. वाकडे नरजेने पहाणारेचे वेळीच बंदोबस्त करावा. अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले,

या वेळी अंबादास गोरट, जिल्हा अध्यक्ष चव्हाण, सभापती अप्पू परमशेट्टी, सोलापूर बाजार समिती उपसभापती सुनील कळके, अप्पासाहेब पाटील, रामचंद्र अरवत, मोतीराम राठोड, आनंद तानवडे, मिलन कल्याणशेट्टी, प्रदीप पाटील, ऋषी लोणारी आदीजण उपस्थित होते. प्रारंभी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आले.

 

देश विदेशातील स्वामी भक्तव लोकांचे सोईसाठी बसस्थानक होत आहे. बसस्थानक काम अडवले. कोर्ट-कचेरी केल्या. जागेच्या उताऱ्यावर बसस्थानक नाव गायब केले होते. पाठीमागील जागेतील सर्व दुकाने अतिक्रमण जागेत आहेत. औरंगजेब कोण, त्याच टेंटस ठेवून अनेक वादंग केले. यापुढे अस काही झाले. तर यापेक्षा मोठा मोर्चा काढला जाईल. दोन फूट तर सोडा, दोन इंच सुद्धा पायवाट सोडणार नाही, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button