गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ रासप स्वबळावर लढविणार – पक्षनिरीक्षक अजित पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातील १०९ विधानसभा मतदारसंघात पक्षीनिरीक्षक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा निरीक्षक म्हणून अजितकुमार पाटील यांची नियुक्ती केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

गुरुवारी अक्कलकोट येथे साहील पॅलेस येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक निरीक्षक अजितकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तानाजी शिंगाडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, सोलापूर विभाग जिल्हा अध्यक्ष विकास आलदर, सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजूरके, जिल्हा सरचिटणीस सुरेश गुत्तेदार, तालुकाध्यक्ष राजकुमार बिराजदार, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडी तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, महादेव पुजारी, संतोष शिंदे, रेवणसिध्द शेरी, पिंटू गावडे, विलास पाटील, शंकर कोकरे, काशिनाथ निंबाळ, पुंडलिक पुजारी, गुणवंत लवटे,देवराव बंदिछोडे, शिवाजी बंदिछोडे, साहेबराव खरात, यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

बैठकीच्या वेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुका अध्यक्ष तसेच युवक आघाडीचे अध्यक्ष यांचा आढावा घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शन करताना पक्षीनिरीक्षक अजितकुमार पाटील म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील १०९ विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असून त्यातील एक अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे. झेंडा आपला, दांडा पण आपला, माणूस पण आपला असला पाहिजे.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार प्रत्येक गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षामध्ये सामील करून घ्यावे. पक्षाच्या आदेश शिरसावंद्य मानून कार्यकर्ते आता माझ्या साठी लढायचे आहे ही भुमीका ठेवली पाहिजे. जानकर साहेब यांच्या बरोबर मी २००३ पासून काम करीत आहे मी पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे मी आहे म्हणून पक्ष आहे आणि माझ्या मुळे जानकर साहेब यांची किंमत आहे अशी ज्यांच्या डोक्यात जी भ्रम आहे ती आधी काढून टाका, कुण्याच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो. जर पद घेऊन त्या पदाला न्याय मिळवून देत नसाल स्वतःहून एक पाऊल मागे घेऊन नविन कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. तसेच पक्षामध्ये गटबाजी करणाऱ्याची खैर केली जाणार असल्याचा इशारा यावेळी दिली. आजच्या बैठकीला जे पदाधिकारी उपस्थित राहीले नाहीत त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button