गावगाथाठळक बातम्या
Akkalkot: अक्कलकोट – वागदरी रस्त्याला खड्ड्यांचा विळखा

अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट – वागदरी रस्त्यावर पावसामुळे मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील शिरशी पुल व शिरवळवाडी जवळची ही दृश्ये आहेत.


दरम्यान, या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने तसेच हजारो प्रवासी ये-जा करत असतात. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय, गरोदर महिला आणि वयोवृद्धांना अशा जीवघेण्या खड्ड्यांचा नाहक त्रास होतो. यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन लवकर खड्डे बुजवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
