गावगाथाठळक बातम्या

ST Mahamandal : आमदार भरत गोगावले यांची एसटी (ST) महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड ; मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई (प्रतिनिधी): मंत्रीपदासाठी तीव्र इच्छुक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. भरत गोगावले यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यासोबत असलेल्या आमदारापैकी सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार म्हणून भरत गोगावले यांची ओळख आहे. भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळेल अशी आशा होती.

 

मात्र, विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरी भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाले नव्हतं. अखेर, राज्य सरकारने शासन निर्णय जारी करत भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. भरत गोगावले यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार जो परिवहन मंत्री असतो तोच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असतो. त्यामुळे भरत गोगावले यांची नियुक्ती लांबणीवर पडली होती. या नियमात बदल करून गोगावले यांची नियुक्ती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button