गावगाथाठळक बातम्या

‘कन्नड अभिवृद्धी प्राधिकार बेंगळुरू’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ६५२ विद्यार्थ्यांना कन्नड माध्यम पुरस्कार प्रदान

सोलापूर (प्रतिनिधी): कन्नड अभिवृद्धी प्राधिकार बेंगळूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 652 विद्यार्थ्यांना कन्नड माध्यम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील लोकांमध्ये कन्नड भाषाबद्दलचे प्रेम, मैत्री, आदर आणि आपुलकी पाहिली तर महाराष्ट्राच्या सीमेवर कन्नड भाषेचे उज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन कन्नड अभिवृद्धी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम बिलीमळे यांनी केले.

कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तमा बिलीमाले यांनी कन्नड माध्यमाच्या शाळांनी मातृभाषा कन्नडवर विशेष भर देऊन पालकांमध्ये कन्नडविषयी प्रेम व आपुलकी निर्माण करून मातृभाषेला विशेष दर्जा दिला असल्याचे मत व्यक्त केले.

रविवारी सोलापूर येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कन्नड भाषिक प्रशालेत अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 12000,11000 आणि 10000 रुपये बक्षीस ,प्रमाणपत्र स्मरण चिन्ह वितरण कार्यक्रमात बोलत होते 

व्यासपीठावर माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, डॉ.संतोष हानगल,दाक्षायाणी हुडेद,

विरुप्पणा कोल्लुर,डॉ बी बी पुजारी,सोमशेखर जमशेट्टी,डॉ.गिरीश जकापुरे,मलीकजान शेख, शरणप्पा फुलारी,शिवानंद गोगांव,बसवराज मसुती,डॉ गुरलिंगप्पा धबाले आदी उपस्थित होते.  

        डॉ.पुरुषोत्तम बिलिमले पुढे बोलताना म्हणाले की ,20 व्या शतकातील महान अभ्यासक, विचारवंत, संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बी.आर.आंबेडकर हे महाराष्ट्रातील असल्याचा अभिमान आहे. मराठ्यांनी सीमेवरील कन्नडीगांना कन्नड-मराठी मातृभाषा जपण्यासाठी व तिचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि मातृभाषेला विशेष दर्जा मिळावा या साठी प्रयत्नशील राहून एकजुटीने कार्य करण्यासाठी आवाहन केले.

कन्नड माध्यम पुरस्कार वितरण करून माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे बोलताना म्हणाले की, कन्नड मातृभाषा टिकावी यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कन्नड माध्यमाच्या शाळा, शिक्षक व पालक आपल्या मुलांना कन्नड माध्यमात शिक्षण देत आहेत. याशिवाय कर्नाटक सरकारच्या कन्नड अभिवृद्धी विकास प्राधिकरणाने सीमावर्ती भागातील कन्नड माध्यमात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करत असलेलं कार्य कौतुकास्पद असून कन्नड माध्यमात शिकलेल्या मुलांना कर्नाटक राज्यात नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे अशी विनंती कर्नाटक सरकारला केली.

या समारंभात महाराष्ट्र राज्यातील 84 हायस्कूल आणि 20 कॉलेजमध्ये कन्नड माध्यमात 10वी आणि 12वीच्या वर्गात शिकलेल्या एकूण 652 विद्यार्थ्यांना कन्नड अभिवृद्धी प्राधिकरणातर्फे रोख पारितोषिक म्हणून, प्रथम ₹12000 द्वितीय ₹11000 तृतीय आणि ₹10,000 रुपये,प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. 

कन्नड अभिवृद्धी प्राधिकरणाचे सचिव डॉ संतोष हानगल स्वागत भाषण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवराज धनशेट्टी, राजशेखर उमराणीकर, विद्याधरा गुरव, शरणू कोळी, रामा सोलापुरे, शरणप्पा फुलारी, प्रशांत बिराजदार व आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले. महेश मेत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुगम संगीत आणि जनपद गीतांचे संगीत कार्यक्रमाने कार्यक्रमाचे सुरुवात झाली. चिदानंद मठपतींनी सूत्रसंचालन केले, तर विद्याधर गुरव यांनी आभार मानले.

कन्नड अभिवृद्धी प्राधिकरण बंगळुरूच्या वतीने आयोजित कन्नड माध्यम पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम बिलिमळे यांच्या हस्ते सोलापूर शहरातील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मैत्रे, सचिव संतोष हानगल, डॉ. दाक्षयाणी हुडेद, विरुपण्णा कल्लुर, ,बी.बी.पुजारी,गुरलिंगप्पा धबाले,गझल साहित्य गिरीश जकापुरे, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र सोमशेखर जमशेट्टी, आदर्श कन्नड बळगचे अध्यक्ष मलिकजान शेख, पत्रकार शरणप्पा फुलारी, राजशेखर उंबरणीक बसवराज मसुती,शिवानंद गोगांव आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button