गावगाथा

*तब्बल तीन वर्षानंतर दुथडी भरून वाहू लागली बोरी…सांगवी बु जलशयातून खालच्या भागात पाणी जाण्यास सुरुवात*

पाऊस पाणी

*तब्बल तीन वर्षानंतर दुथडी भरून वाहू लागली बोरी…सांगवी बु जलशयातून खालच्या भागात पाणी जाण्यास सुरुवात*

✒️ *प्रविणकुमार बाबर / सांगवी*

अक्कलकोट दि 26
तालुक्यातील सकल भागात व तुळजापूर, उमरगा व इटकळ या तालुक्यातील दमदार झालेल्या पावसाने कुरनूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून, धरण शंभर टक्के भरले असून धरणातून पाणी ओव्हर फ्लो होत असल्यामुळे कुरनूर धरणातून 210 च्या विसर्गाने पाणी सोडल्याने तब्बल तीन वर्षानंतर सांगवी बोरी नदी दुसरी भरून वाहत आहे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली असून जर पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर नदीकाठच्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या तीन वर्षापासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झाले होते. यंदा मात्र परतीच्या पावसाने वरच्या भागात चांगलीच हजेरी लावल्याने परिसरात नद्या नाले व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे नाल्यांना भरपूर प्रमाणात पाणीसाठा आल्या झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाले आहेत. तालुक्यातील सर्वच पाझर तलाव साठवण तलाव नद्या नाले या परतीच्या पावसाने जवळपास शंभर टक्के भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button