गावगाथा

*ऍड.पंडीतभाऊ राठोड यांच्या पुणे जिल्हा दौरा मुळे बंजारा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.*

गाठीभेटी

*ऍड.पंडीतभाऊ राठोड यांच्या पुणे जिल्हा दौरा मुळे बंजारा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.*

पुणे – गोर बंजारा समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्य दुत, कुंभ मेळावा प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बंजारा परिषदचे महासचिव तथा भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री व संत सेवालाल महाराज तांडा समृध्दी योजना राज्य समन्वयक ऍड.पंडीतभाऊ राठोड यांनी पुणे जिल्हा दौरा करून संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृध्दी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तांडा भेटी देऊन योजना अंतर्गत होणारे विकास कामे या बाबत माहिती देत समाजाला एक होऊन एकजुटता सोबत सशक्त भारत निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेऊन बंजारा समाजाने सरकारच्या माध्यमातून वैभवशाली परंपरा आसलेल्या तांड्यांचा विकास करून घ्यायचे आहे असे आव्हान ऍड.पंडीतभाऊ राठोड यांनी केले आहे. ठीक ठिकाणी समाज बांधवांनी भाऊंचे भव्य स्वागत सत्कार करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील तमाम तांडा दौरा करून गोर बंजारा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या वेळी दौरा संपर्कप्रमुख व राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेश प्रवक्ता अमोलभाऊ पवार, पुणे विभागीय प्रमुख रविराज राठोड, अशासकीय सदस्य व उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड,अशासकीय सदस्य व कार्याध्यक्ष अनिलजी नाईक,जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ राठोड, कु.कविता आडे, राष्ट्रीय बंजारा परिषदचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुबोध पवार, विभागीय संतोष राठोड, पुणे शहर अध्यक्ष सागर राठोड, उद्योजक लक्ष्मण राठोड, उपाध्यक्ष संदीप जाधव, संघटक अनिल चव्हाण, पि.ची.शहर अध्यक्ष अर्जुन आडे,पत्रकार कांता राठोड , उद्योजक आनंद नायक,खेड तालुका अध्यक्ष रमेश जाधव, कार्याध्यक्ष अनिकेत जाधव, सौ.संगीता पवार,गोपाल राठोड,रमेश खेतावत , व तमाम बंजारा समाजांनी दौरा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊन मेहनत घेतले. दौरा संपर्कप्रमुख अमोलभाऊ पवार यांनी पुणे जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाचे व राष्ट्रीय बंजारा परिषदच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button