अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गेल्या ७५ दिवसात तब्बल ३८३ कोटीचा निधी आणण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी ठरले
विकास निधी

अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गेल्या ७५ दिवसात तब्बल ३८३ कोटीचा निधी आणण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी ठरले
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*अक्कलकोट विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता भरीव निधी आणण्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अव्वल ठरले आहेत. गेल्या ३ दशकांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याकामी यशस्वी ठरलेले आमदार कल्याणशेट्टी यांना मावळत्या पंचवार्षिक मधील सुरुवातीच्या काळातील आघाडी सरकारमध्ये देखील विकास कामांकरिता निधी आणण्यामध्ये ते मागे राहिलेले नांहीत. त्यानंतर देखील विकास निधीचा चढता आलेख पाहता गेल्या ७५ दिवसात त्यांनी रुपये ३८३ कोटीचा निधी आणण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी ठरले आहेत.

अक्कलकोट विधानसभा मतदार संघ हा सीमाभागातला राज्याचा टेलएंड तालुका हा अवर्षण दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तो पुसून काढण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी आमदारकीच्या सुरुवातीच्या काळापासूनच कंबर कसल्याने मतदार संघाला अच्छे दिन आज पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या लोकप्रातीनिधिनी पुन्हा येऊच्या नादात विकासाचा अनुशेष भरून निघाला नांही. आमदार कल्याणशेट्टी यांनी ओळखून मतदार संघाच्या विकासासाठी संधीचे सोनं करण्याकामी अग्रेसर ठरले आहेत.

आमदार कल्याणशेट्टी यांनी गेल्या ७५ दिवसामध्ये मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीकरिता रु.६१ कोटी, इको टुरिझम केंद्र कर्जाळ रु.२४ कोटी, मतदार संघातील २८ ग्रामपंचायत पर्यावरण पूर्वक व स्मार्ट करिता निधी रु.६ कोटी, श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे उपजिल्हा रुग्णालय बांधकाम करिता रु.१०८ कोटी, यापैकी सुमारे रु.७० कोटीचा बांधकाम निधीची निविदा निघाली आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोटातील उत्तर व दक्षिण पोलीस ठाण्यांच्या इमारती करिता रु.१० कोटी, बहुप्रतीक्षित अक्कलकोट न्यायालयाच्या इमारत बांधकाम करिता रु.६० कोटी निधी तर विधानसभा मतदार संघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव दर्गनहळ्ळी, धोत्री या गावाला जोडणाऱ्या चौपदरीकरण करणे या कारीताच्या रु.११ कोटी ७० लाख ९३ हजार ३९९ ची बी-१ निविदा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांनी नुकतीच काढली आहे. याबरोबरच अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नगर परिषदेकरिता शहर विकासासाठी विविध योजनेतून आमदार कल्याणशेट्टी यांनी भरीव निधी आणण्यात यशस्वी झाले आहेत.
