कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी…
———————————- अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अक्कलकोट यांच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना स्वामी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी अहिंसा तत्व पाळले, हिंसा न करता संघर्ष करण्याची शिकवण दिली. गांधीजींनी सत्याग्रहाने अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा दिला, स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन दिले. ब्रिटिशांच्या वस्तूवर बहिष्कार टाकला. आपणही गांधीजींचे तत्व पाळूयात असे उपस्थित सर्वांना आवाहन केले. यानंतर सेमी विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख निशिगंधा कोळी यांनी बोलताना, भारताचे दुसरे पंतप्रधान स्वातंत्र्य सेनानी आणि एक महान नेते म्हणून लालबहादूर शास्त्री यांची ओळख असून अनेक विद्रोही मोहिमांचे ते नेतृत्व केले होते. स्वातंत्र्यासाठी सात वर्षे तरुंगवास भोगले, त्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता. त्यांचा देशप्रेम, अखंडता आणि एकता या मूल्यांवर खूप विश्वास होता असे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कल्पना स्वामी, रविकिरण दंतकाळे, निंगप्पा कोटनुर, निशिगंधा कोळी, विद्याश्री बिराजदार, वनिता काजळे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.