*श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुष्मिता चितले व भाग्यश्री कोळी यांनी केले तर आभार प्रा राजीव कोरे यांनी मानले.

*श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न*

श्री क्षेत्र तीर्थ ता. द. सोलापूर दि. २०/०२/२४
प्रारंभी विद्येची आराध्य दैवत सरस्वती मातेची पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आले. . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर सोनकवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ मीनाक्षी पाटील उपस्थित होते. सौ पाटील यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “अंधार दूर करणारा व्यक्ती म्हणजे गुरु ” योग्य नियोजन व सातत्याच्या जोरावर परीक्षेमध्ये यश संपादन करा असे आव्हान केले श्री नागराज पाटील यांनी आपल्या मनोगताद्वारे आदर्श व्यक्तिमत्त्वाची उदाहरणे देत प्रचंड आत्मविश्वास व कष्टाच्या जोरावर जीवनात यशस्वी होण्याविषयी प्रेरणा दिली.
प्राचार्य श्री सुधीर सोनकवडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्याना उज्वल यशाचे शुभेच्छा दिले. यावेळी विद्यार्थी आपल्या मनोगतातून शाळेविषयी आदर व्यक्त करत गुरुजनांचे कृतज्ञता व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ महिंद्रकर मॅडम सचिन गुजा, अमर पाटील, सिद्धाराम पाटील, शांतप्पा बगले, रेवणय्या मठपती अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुष्मिता चितले व भाग्यश्री कोळी यांनी केले तर आभार प्रा राजीव कोरे यांनी मानले.
