गावगाथा

वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या दर्शनाने लाभलेली प्रसन्नता अत्यंत मौलिक – हास्य कलाकार विजय पाटकर

विजय पाटकर यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या दर्शनाने लाभलेली प्रसन्नता अत्यंत मौलिक – हास्य कलाकार सुजित पाटकर

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, दि.५/१/२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज संस्थानचे कामकाज व दिनचर्या हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालत असून मंदिरातील सर्व व्यवस्था देखील अत्यंत उत्तम आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाप्रमाणे आपणासही स्वामींचे आशिर्वाद व मानसिक समाधान लाभले आहे. वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या दर्शनाने लाभलेली प्रसन्नता अत्यंत मौलिक असून मनाला समाधान देणारे असल्याचे मनोगत मराठी चित्रपटातील प्रसिद्ध हास्य कलाकार सुजित पाटकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच स्वामींच्या दर्शनाकरिता येथे आले असता बोलत होते. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. याप्रसंगी
सुजित पाटकर बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, चित्तरंजन अगरथडे,
लखन झंपले, अमर पाटील, प्रसाद सोनार, गिरीश पवार, नागनाथ गुंजले, सचिन हन्नूरे, मनोज जाधव इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – सुजित पाटकर यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button